वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Vadhdivas Shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात .

ADVERTISEMENT

काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस सहज लक्षात राहतात पण दहा ते पंधरा वर्षापूर्वी हे चित्र थोडं वेगळं होतं. नातेवाईक किंव्हा मित्र मैत्रिणीचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी डायरी किंव्हा भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर यांचाच सहारा घेतला जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चारोळया आठवणीने वहीत लिहून ठेवलेल्या असायच्या. पण हल्ली मात्र मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं किती सोपं झालं आहे ना! गूगल मध्ये ( Marathi Birthday Wishes ) टाईप केले की, तुम्हाला पाहिजे तसे त्या अर्थाचे हजारो मराठी बर्थडे SMS क्षणात मिळतात.

वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी. सगळ्यात अगोदर कोण आपल्याला शुभेच्छा देणार आणि कोणाच्या लक्षात आपला वाढदिवस राहतो याकडे आपले बारकाईने लक्ष असते. रात्री बाराचा ठोका पडला कि, वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. त्या शुभेच्छांमध्ये आपल्या हृदया जवळच्या प्रिय व्यक्तीच्या शुभेच्छा आल्या कि, मग काय बघायलाच नको, वाढदिवस साजरा नाही केला तरी मनामध्ये आनंदाचे कारंजे फुलायला लागतात. ती प्रिय व्यक्ती म्हणजे ‘तो किंव्हा ती’. त्या प्रिय व्यक्तीने आपल्यासाठी आपल्या बोली भाषेत मराठीमध्ये एखादी कविता किंव्हा साधा मनाला भावणारा सुंदर message टाईप करून पाठवला तरी मिळणारा आनंद हा गगनात मावेनासा होतो.

मला असे वाटते कि, मराठी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास आपल्या भावना थेट त्या व्यक्तीच्या काळजाला भिडतात आणि त्या शुभेच्छांच्या शब्दातून जणू आपण स्वतः त्या व्यक्तीसमोर व्यक्त होत असतो. त्यामुळे अशा वाढदिवसाच्या शुभेच्छांची सुरेल गुंफण त्या दिवसाचे महत्त्व द्विगुणित करून जाते. मराठी वाढदिवस शुभेच्छा टाईप केले तर तुमच्यासमोर असंख्य शुभेच्छांची दालने उघडी होतात, प्रत्येक नात्यासाठी हवा तसा संदेश चटकन शोधता येतो. मग आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवणार ना छानसा शुभेच्छांचा Message!

ADVERTISEMENT

प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं नातं खास आहे,
कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील,
पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील,
तुझे रुसणे फुगणे मला आवडते,
त्यातूनच तुझे माझे नाते फुलते,
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा,
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

 

ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Mitra

प्रत्येकाचा एक जिवलग दोस्त असतो, जीवाला जीव देणारा, सुख-दुःखात उभा राहणारा, संकटात धावून येणारा. अश्या मित्राचा वाढदिवस म्हणजे त्याला ऍडव्हान्स शुभेच्छा देण्यासाठी आपण तत्पर असतो, एकत्र पार्टीचा बेत ठरलेला असतो, त्याच्या आवडीचे गिफ्ट आधीच बुक झालेले असते. रक्ताच्या नात्यापेक्षा खास अश्या नात्याला हृदयात अगदी मोलाचे स्थान असते म्हणून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या मित्रासाठी हार्दिक (म्हणजेच हृदयातून) शुभेच्छा देणे महत्वाचे वाटते.

मित्र असावा तुझ्यासारखा,
स्वतःच्या घासातला घास देणारा..
मित्र असावा तुझ्यासारखा,
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा..
मित्र असावा तुझ्यासारखा,
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा..
खूप आले आणि खूप गेले,
पण मित्रा हृदयात घर तू केले..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

 

मैत्रिणीकडून मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Maitrin

जसा एक मित्र असतो तशीच एक मैत्रीण पण असते, आपल्याला सांभाळून घेणारी आपल्या भावना जपणारी हो ना…

तुझा सहवास माझ्यासाठी किती मौल्यवान आहे
हे शब्दात सांगणे कठीण आहे,
तुझ्या प्रेमाचा हात असाच माझ्या पाठीवर राहू दे
भरभरून यश तुझ्या पदरी पडू दे,
आपल्या मैत्रीचे कौतुक जगभर पसरू दे
हा वाढदिवसाचा सोहळा असाच येऊ दे..
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

बहिणीला भावाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Tai

भाऊ बहिणीचं नातं जगावेगळं असं आहे. लहान बहीण असेल तर भाऊ तिच्यासाठी पाठीराखा असतो. काही झालं तर दादा आहे ना… बस्स घेईल सगळं सांभाळून हा लहान बहिणीचा तिच्या दादावर असलेला विश्वास असतो. मोठी बहीण असेल तर ती दुसरी आई म्हणून पाठच्या भावावर अतोनात प्रेम करत असते. सासरी जाऊन देखील तिच्या प्रेमाची शिदोरी भावासाठी तिळमात्र कमी झालेली नसते. भाऊ कितीही मोठा झाला तरी तिला तो लहानच वाटतो. या नात्यांमध्ये प्रेम असते, भांडण असते, एकमेकांना चिडवणे असते, डिवचने असते. सगळं काही या नात्यामध्ये सामावलेलं असतं. भाऊ – बहीण एकमेकांपासून कितीही दूर असले तरी त्यांचे प्रेम, वात्सल्य, काळजी काही कमी झालेली नसते. या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादा आणि ताई तत्पर असतात. तुझ्या वाढदिवसाला मी आधी शुभेच्छा दिल्या होत्या तू नाही दिल्या, यावरून ताई कधी कधी रुसलेली सुद्धा असते तर यावर प्रतिउत्तर हे दादा कडे ठरलेले असते. कितीही भांडले तरी भाऊ -बहिणीच्या नात्यात एक कमालीचा गोडवा असतो. हे तितकेच खरे आहे.

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझं खळखळत हास्य
म्हणजे आई बाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे…
वाढदिवसाच्या तुला भरभरून शुभेच्छा !

 

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Dada

घरामध्ये वडिलांचा दर्जा मोठ्या भावाला दिला जातो. वडील जसे आपल्याला काय हवे नको ते बघतात तशीच काळजी मोठा भाऊ देखील घेत असतो.

 

आईला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा | Happy Birthday Aai

आईचे ऋण आपल्यावर अतोनात असते त्याची परतफेड करणे कोणाला शक्य नाही.

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबांना | Happy Birthday Baba

घरात आपल्या सर्वात जवळची असते ती म्हणजे ‘आई’ बरोबर ना… तर त्या उलट असतात ‘बाबा’ म्हणजे आपले वडील. आपण आपल्या वडिलांना एका चाकोरीबद्ध चौकटीत फिट केलेले असते. त्यामुळे आपल्यासाठी थोडे का होईना ते आई पेक्षा दूरच असतात. लहानपणापासून त्यांचा दरारा आपण बघत आलेलो असतो. आपल्या मुला-मुलींनी आयुष्यात यशस्वी व्हावे यासाठी त्यांची रात्र दिवस मेहनत सुरु असते. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरु असतात, आपल्या लहान सहान गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवणारे बाबा, स्वतःचा वाढदिवस मात्र विसरून जातात. अशावेळी आपण बाबांना एका कागदावर मराठीत वाढदिवसाच्या चार ओळी जरी लिहून पाठवल्या किंव्हा एखादा छानसा मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा message टाईप करून पाठवला तर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद हा तुम्हांला काही औरच सांगून जाईल. तुमच्या त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या दोन ओळी देखील त्यांच्या मनाला अनंत सुखाचे समाधान देऊन जातात.

बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे
तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले
तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले
मला एक चांगले जीवन लाभले
तुमच्या मेहनतीने हे सारे घडले
चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला
दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला
तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा…
बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

 

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवरा बायकोचे नाते काही जगावेगळेच असते, त्या नात्यात दोन अनोळखी जीवांचे मिलन असते, दोघे भिन्न अश्या वातावरणातून आलेले असतांना, एकमेकांना समजून घेण्याची, आयुष्यभर एकत्र राहण्याची परमेश्वराने बांधलेली ती गाठ असते. आपले हक्काचे घर सोडून मुलगी जेंव्हा पत्नी बनून सासरच्या घरी येते त्यावेळी ती आपले सर्व आयुष्य पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी समर्पित करते. तिला माहेरचे सर्व सुख पतीच्या घरी मिळावे अशी तिची अपेक्षा असते,

तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!

 

पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा

पत्नी घराचा पाया तर पती घरचे छत असते. घरासाठी प्रत्येक जबाबदारी पती चोखपणे निभावत असतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या सुखदुःखाची जाणीव ठेवणारा, घरच्या कलहात आपली बाजू सांभाळून घेणारा असा जोडीदार मिळाला तर त्यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही.

तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना | Happy Birthday Ajoba

ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घराला विशेष असे घरपण येते. आजी आजोबा आणि नातवंडामध्ये तीन पिढ्यांचे अतूट नाते दडलेले असते.

आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच,
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात.
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत.
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत.
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे,
हेच ईश्वराकडे मागणे आहे
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा…
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

 

मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा

आई वडील आपल्या मुलांसाठी अतोनात कष्ट घेतात. मुलांमध्ये ते आपले भविष्य बघतात. स्वतःच्या इच्छा मारून मुलांच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतात, आपली मुले मोठी व्हावी खूप शिकावी, त्यांनी मोठे यश मिळवावे यातच त्यांचे समाधान दडलेले असते. अश्याच विचारांच्या बाबांची आपल्या मुलीसाठी वाढदिवसाची शुभेच्छा इथे व्यक्त होते.

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

 

सासूबाई वाढदिवस शुभेच्छा | Happy Birthday Sasubai

 

सुनबाई वाढदिवस शुभेच्छा | Happy Birthday Sunbai

 

कदाचित तुम्हाला वाढदिवसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल


Visit – नक्की पहा

वाचा आणखी बरेच वाढदिवस शुभेच्छा संदेश आमच्या Birthday SMS Marathi या कॅटेगरी पेजवर

तुम्हाला या लेखात आणखी एखाद्या नात्याविषयी शुभेच्छा संदेश हवा असेल तर खाली कंमेंट मध्ये त्या नात्याचे नाव लिहून पाठवा तो आम्ही इथे लिहण्याचा प्रयत्न करू. उदा. काकांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.

[sc_fs_multi_faq headline-0=”p” question-0=”Latest Birthday Wishes Marathi Collection शोधताय?  कुठे भेटतील?” answer-0=”तुम्ही जर नवीन मराठी बर्थडे विशेस च्या शोधात असाल तर तुम्हाला Hindimarathisms.com वर भेटतील हजारो शुभेच्छा संदेश जे आम्ही खास निवडले आहेत प्रत्येक नात्यांसाठी…” image-0=”” headline-1=”p” question-1=”वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा कोणत्या वेबसाईट वर भेटतील?” answer-1=”आमच्या वरील संकेतस्थळावर भेट द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच आवडतील..” image-1=”” headline-2=”p” question-2=”प्रिय मित्रासाठी Marathi Birthday Status कसा शोधावा?” answer-2=”आम्ही आमच्या वेबसाईटवर दररोज नव-नवीन शुभेच्छा संदेश अपलोड करत असतो, आमच्या वेबसाईटच्या Search Bar वर तुम्ही तुमच्या मित्राचे नाव टाईप करून मराठी बर्थडे स्टेटस शोधू शकता… उदा.अजय किव्हा Happy Birthday Ajay” image-2=”” headline-3=”p” question-3=”आईसाठी, बाबांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश कसे शोधायचे?” answer-3=”आमच्या वेबसाईटच्या Search Bar वर तुम्ही कोणत्याही नात्यासाठी त्या नात्याचे नाव टाईप करून मराठी वाढदिवस शुभेच्छा संदेश शोधू शकता… उदा. Happy Birthday Aai, किव्हा Happy Birthday Baba” image-3=”” count=”4″ html=”true” css_class=””]

Comments are closed.