आज नवरात्री ! तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! नवरात्रीच्या शुभेच्छा ( Navratri Wishes Marathi ) शोधत असाल तर तुम्हाला या लेखात वाचायला मिळतील सर्वोत्कृष्ट शुभेच्छा ज्या खास आम्ही तुमच्यासाठी निवड केल्या आहेत. या शुभेच्छा बनवण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली आहे आणि आमहाला आशा आहे कि या शुभेच्छा तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर कराल.
आम्ही प्रत्येक वर्षी या पानावर नवनवीन नवरात्र उत्सव शुभेच्छा अपडेट करत असतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येकवर्षी काहीतरी नवीन वाचायला आणि शेअर करायला मिळेल. जर तुमच्याकडे देखील काही नवरात्री संदर्भात सुंदर ओळी असतील तर त्या खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा त्याची आम्ही शुभेच्छा इमेज बनवून या पानावर पोस्ट करू.
आणखी Shubhechha स्टेटस बॅनर्स Quotes आणि SMS पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या लिंक ला देखील भेट देऊ शकता.==>>Navratri Wishes Marathi Collection
नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी | Navratri Utsav Shubhechha Marathi
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!
शुभ नवरात्री | Shubh Navratri
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शारदीय नवरात्रौउत्सव शुभेच्छा २०२१ | Shardiya Navratroutsav Shubhechha 2021
नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी | Navratri Wishes Marathi
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो !
मित्रानो वर्षातून चार नवरात्री येतात, त्यापैकी चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र या खास मानल्या जातात, बाकीच्या आषाढ आणि माघ महिन्यातील नवरात्री ह्या अनेक जणांना माहित नसल्याने त्यांना गुप्त नवरात्री असे देखील म्हटले जाते. चैत्र नवरात्री हि चैत्र महिन्यात येत असल्याने तिला असे नाव आहे, या नवरात्रीत उपवास आणि नऊ दिवस देवीचे व्रत केले जाते. चैत्र नवरात्री हे एक घरघुती व्रत असल्याने हि उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जात नाही.
शारदीय नवरात्री म्हणजे शरद ऋतू च्या प्रारंभी येत असल्याने असे नाव पडले. शारदीय नवरात्री मध्ये नऊ दिवस उपवास करून आदिशक्तीची आराधना केली जाते. अष्टभुजा सिहारुढ दुर्गा देवीची मूर्ती स्थापन करून पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अखंड दीप लावून देवीची शास्त्रशुद्ध पूजा केली जाते. दररोज झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करून नऊ दिवस सकाळ संध्याकाळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ म्हणून शारदीय नवरात्री व्रत केले जाते. गरबा आणि दांडिया रास खेळून सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहाने शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
नवरात्र उत्सव शुभेच्छा | Navaratri Festival Wishes Marathi
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!
घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा | Ghatasthapana Wishes in Marathi
ओम सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते,
जय माता दी!
नऊ दिवसाची नवरात्र,
भारतीय संस्कृतीचे आहे हे सत्र..
अन्नधान्य पिकविण्याची शिकवण,
घेऊ घटस्थापना करून..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आली नवरात्री,
झाली घटाची स्थापना..
करुनी नऊ रूपांची आराधना,
करू दुर्गेची उपासना..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवरात्री विशेष मराठी | Navratri Wishes in Marathi
आले नवरात्राचे दिन सामोरी,
होईल घटस्थापना घरोघरी..
वीराजे देवी नित्य नव्या आसनावरी,
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी..
नऊ रात्री करू तिची आराधना,
करेल पूर्ण ती सर्वांची मनोकामना..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
संपूर्ण विश्व जिला शरण आले,
त्या देवीला आज शरण जाऊया..
या मंगल दिनी सर्वांनी मिळून,
देवीचे या स्मरण करूया..!
नवरात्री कोट्स मराठी | Navratri Quotes in Marathi
नवरात्र चा अर्थ:
N – नवचेतना
A – अखंड ज्योति
V – विघ्ननाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – असुर मर्दिनी..
🙏नवरात्र उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏
अंबेने केला राक्षसाचा संहार,
स्त्रीनेही करावा अन्यायाचा प्रतिकार..
स्त्री हे अंबेचे रूप जाणा,
स्त्रियांवरील अत्याचार टाळा..
नऊ दिवसाचे नवरात्र,
स्त्रीशक्तीचा करू जागर..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
देवी कोट्स मराठी | Devi Quotes in Marathi
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे..
चिंता हरिणी, पाप नाशिनी,
संकटमोचन, तू दुर्गामाता..
संकटी असता भक्त जेव्हा,
देई बळ तुझ्या भोळ्या भक्ता..
भक्ता तारिसी तू,
जगत जननी माझी आई..
त्रिपुरा सुंदरी, सिध्दीदात्री,
करितो नमन तुज अंबाबाई..
जागर करती भक्तजन सारे,
ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा..
करिता गुणगान तुझे अंबे,
दूर होती साऱ्या व्यथा..
नवरात्र संदेश मराठी | Navratri SMS / Messages in Marathi
करू तिची मनापासून आराधना,
सांगू तिला एकच मनोकामना..
वाचव दृष्ट लागलेल्या या जगाला,
कायमचं दूर कर ह्या कोरोनाला..
खरंच आपण करतो का मनापासून भक्ती?
करत असतो तर असती का अशी परिस्थिती?
मुलगी जन्मास आली की नाक फिरवतात,
मात्र लक्ष्मीची पावले शुभ मानतात..!
नवरात्री स्टेटस मराठी | Navratri Status in Marathi
माय, बहीण, पत्नी, मुलगी, सखी नि प्रिया..
आदिशक्ती, दुर्गा, चंडिका, तीच आदिमाया..
शक्तीरूप धारिणी, महिषासुर मर्दिनी,
सांभाळते भक्तांना, अनंत रूपे घेउनी..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवरात्री कॅपशन मराठी | Navratri Slogans / Captions in Marathi
शक्तीपीठ कोल्हापूरी,
महालक्ष्मी अंबाबाई..
केला संहार दुष्टांचा,
दॄष्टी भक्तांवरी राही..
साडेतीन शक्तिपीठे,
असे ॐकार स्वरूप..
महाकाली, महालक्ष्मी,
महा सरस्वती रूप..
घेऊ दर्शन देवीचे,
मागू तिला वरदान..
दूर होवो साऱ्या व्यथा,
व्हावे समॄद्ध जीवन..
नवरात्री शायरी / चारोळी मराठी | Navratri Shayari / Charoli in Marathi
विडा चढवू देवीला,
भरू खणानारळाची ओटी..
नेसवू पैठणी देवीला,
लांबसडक केसात माळू वेणी..
भरू हातात हिरवा चुडा,
घालू पायात जोडवी..
भक्तीचा तो वाहात राहू दे झरा,
नवरात्रीच्या उत्सवाने आनंद येतो घरा घरा..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवरात्री शुभेच्छापत्र मराठी | Navratri Greetings in Marathi
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनाची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
शुभ सकाळ!
Today is Navratri! Happy Navratri to all of you! If you are looking for Navratri Wishes Marathi, you will find the best wishes in this article that we have specially selected for you. We have put a lot of effort into making these wishes more beautiful and we hope you will like these wishes and will definitely share them with your friends.
Every year we update the Navratri greetings on this page so that you get to read and share something new every year. If you also have some beautiful lines regarding Navratri, write them in the comment box below and we will convert them to an image and post it on this page.
There are four types of Navaratri in the year, out of which the Navratra which comes in the months of Chaitra and Ashwin are considered special. As Chaitra Navratri falls in the month of Chaitra, it has the name Chaitra. Devotees of Devi do fasting on this Navratri and continue fasting for nine days. As Chaitra Navratri is done at home & it’s a small fast, it is not celebrated as a public festival.
Shardiya Navratri is named after the beginning of Sharad Rutu. Adishakti is worshiped by fasting for nine days in the Shardiya Navratri. The octagonal idol of Goddess Durga is mounted at home on the first day with the mounting of a jar called Ghatsthapna. The goddess is worshiped in a scriptural manner by lighting a continuous lamp for nine days. Saptashati Path is read by devotees in front of the Goddess for nine days in the morning and evening by offering a garland of marigold flowers every day.
Shardiya Navratri is celebrated with great enthusiasm in public by playing Garba and Dandiya Raas on singing & playing Mata rani songs.