Happy Birthday Wishes for Kaku or Kaki in Marathi | काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काकूसाठी वाढदिवस शुभेच्छा.. | Birthday Wishes in Marathi for Aunty

साधी भोळी काकू आमची,
नाही तिला कोणाचा हेवा देवा..
अन्नपूर्णेचा जणू तिने घेतला आहे वसा,
येता जाता देते खायला..
आईसारखा जीव लावते,
आमच्यावर भरभरून प्रेम करते..
आमच्या लाडक्या काकूला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !


जिने आईसारखी माया लावली,
नाही केला कधी दुजाभाव..
गोकुळासारखे सौख्य नांदते,
जिच्यामुळे घरात आज..
जिच्यात होतो मला आईचा भास,
अशी आमची काकू आहे खास..
काकू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


साधी राहणी उच्च विचार घेऊन आली सासरी,
याच शिकवणीची तिने दिली आम्हांला शिदोरी..
खूप शिका मोठे व्हा, हीच तिची शिकवण,
तिच्या आशीर्वादाने झाले आमचे कल्याण..
काकू तुला वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा !


काकू आमची आहे खास,
फोनवर बोलते तासंतास..
ओठावर लाली, हातात मोबाईल,
काकूचा आमच्या थाटचं भारी..
पण माया लावते खूप सारी..
आमच्या प्रेमळ काकूला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


घरभर असतो जिचा वावर,
काकांवर आजमावते पावर..
काकूचा आहे नखरा भारी,
नेसते रोज साडी नवी कोरी..
काकू आहे आमचे लाड पुरवणारी,
काकूला आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा भारी..!


घराला घरपण देणारी,
आईसारखी माया लावणारी..
नसते जेंव्हा ती घरी,
सुनी वाटते हि दुनिया सारी..
माझ्या प्रेमळ काकूंना,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !


काकूमध्ये दिसते मला
माझी दुसरी आई..
शिस्तीत आहे काकू माझी
फारच कडक बाई!
तब्येत साथ देत नाही तरी,
काम करते घाई घाई..
देवाकडे एकच मागणे,
निरोगी ठेव तू माझ्या काकूला..
वाढदिवसाच्या दिनी खूप खूप शुभेच्छा !


काकू माझी हसरी बुजरी,
घरातली जणू नवी नवरी..
सगळ्यांसाठी आहे खास ती,
प्रत्येकाशी प्रेमाने वागते ती,
अशा माझ्या प्रेमळ काकूला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक!


पावसाच्या सरी सारखे,
सौख्य तुझ्या अंगणी बहरावे..
जे जे हवे ते ते,
देवाकडून तुला मिळावे..
आई सारखे प्रेम तू,
आमच्यावर नेहमी करत राहावे..
हेच तुझ्या जन्मदिनी देवाला मागणे..
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


काकूच्या प्रेमाची सर नाही कशाला,
दूर राहूनही जवळ वाटते ती मला..
प्रत्येक समस्येचे असते तिच्याकडे Solution,
म्हणून तर कशाचंही नसतं मला Tension..
अशीच पाठीवर राहू दे थाप तिची,
हिच आहे इच्छा माझी..
काकू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


काकी, येणारा प्रत्येक दिवस हा,
तुझ्या आनंदाचा असावा..
तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्या,
डोक्यावर नेहमी राहावा..
तुझा वाढदिवस दरवर्षी आम्ही,
उत्सव म्हणून साजरा करावा..
हिच आमची सदिच्छा..
काकी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.