मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Daughter

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


तू नेहमी हसत रहा..
तुझ्या हसण्याने, असण्याने,
घर कसं भरलेलं वाटतं..!
माझ्या गोड मुलीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

माझी गोड मुलगी..
आई-बाबांची शान आणि त्यांचा मान जपणारी..
हक्काने, हट्टाने काळजी करणारी..
माझ्या लाडक्या मुलीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!


दुःख आणि वेदनांचे,
नावही नको तुझ्या चेहऱ्यावर..
नेहमी हास्याची खळी असेल..
कधी आले संकट काही तुझ्यावर,
तर नेहमी तुझी आई तुझ्यासोबत असेल…
माझ्या गोड मुलीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


येणाऱ्या प्रत्येक दिवसा सोबत
तुझे आयुष्य फुलत राहो,
आणि तू यशाच्या आकाशात
उंच भरारी घेत राहो..
हीच सदिच्छा…
प्रिय __ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

ADVERTISEMENT

मुलगी मिळायला भाग्य लागतं..
आणि तुझ्या सारखी मुलगी मिळायला,
सौभाग्य…!
माझ्या प्रिय मुलीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


शब्दातला अर्थ आहेस तू..
हास्यातला आनंद आहेस तू..
जगातली बेस्ट आणि सर्वात खास आहेस तू..
माझ्या गोड मुलीला,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!


कधी हसणारी, कधी रुसणारी..
पण नेहमी माझ्या सोबत असणारी..
माझी गोड मुलगी..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा…!

ADVERTISEMENT

प्रिय बाळा,
तू कितीही मोठी झाली तरी,
माझ्यासाठी माझी गोड छोटीशी परीच आहेस…
माझ्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!


ज्या दिवशी तुझा जन्म झाला,
स्वतःला सर्वात भाग्यवान समजले…
आणि आज तोच भाग्याचा दिवस,
म्हणजेच तुझा वाढदिवस…!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा…!


ज्या क्षणी तु ह्या घरात पाऊल ठेवलंस,
या घराला घरपण आलं..
आणि गप्प असणाऱ्या घराला
जनु आनंदाचं उधाण आलं…!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा..!
नेहमी हसत राहा..!


आजचा दिवस तुझा आहे… फक्त तुझा..!
आणि आजचा दिवस जितका खास आहे,
त्यापेक्षाही खास माझी राजकन्या आहे…!
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


किती सुंदर नातं असतं बाबा आणि मुलीचं…
जसं बाग आणि फुलाचं,
आनंद आणि हास्याचं..
आणि ते नातं जपणारी मुलगी मला लाभली,
हे माझं भाग्यचं..!
माझ्या सुंदर आणि लाडक्या मुलीला
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..!