Happy Birthday Wishes for Aatya in Marathi | आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes to Atya Marathi

Happy Birthday Aatya in Marathi | आत्यासाठी वाढदिवस शुभेच्छा

नेसून पैठणी साडी,
चालवते आत्या नवी गाडी..
सगळ्यांना देते दम भारी,
आत्या माझी एक नंबरी..
माझ्या प्रेमळ आत्याला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा..!

Happy Birthday Aatya in Marathi

Happy Birthday Aatya | हैप्पी बर्थडे आत्या

थोडीशी रागीट, थोडीशी नटखट,
आत्या आमची आहे घराची जान..
लग्न-समारंभात तिला मान..
बाबांसाठी अजूनही आहे ती लहान..
माझ्यासाठी ती लाड पुरवणारी खाण..
माझ्या गोड आत्तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !

Happy Birthday Aatya

सासरी राहूनही माहेरच्या
लोकांसाठी झुरणारी..
माहेरी येण्यासाठी
सण – उत्सवांची वाट पाहणारी..
सासरच्या मंडळीत माहेरची नाते शोधणारी..
अशा माझ्या आत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !


आजी-आजोबांची लेक लाडकी,
आईसाठी बहिण धाकटी..
माहेरच्यांसाठी हळवी होते,
कधी लहान होऊन आमच्यात रमते..
खंबीर होऊन बाबांच्या पाठी उभी राहते,
या माझ्या आत्याचा आहे आज वाढदिवस..!
सदैव सुखी ठेव देवा तिला, हाच माझा नवस..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आत्या..!


लेक जन्माला येते एका घरी,
दोन घरांची तिच्या हाती दोरी..
निभावते नाते मनाने सारी,
ती असते आत्या आपली न्यारी..
माझ्या लाडक्या आत्याला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Atya Birthday Wishes in Marathi | आत्या बर्थडे विशेस मराठी

थोडी हसते, थोडी रुसते,
आत्या आमची किती छान दिसते..
लेक लाडकी आहे माहेरीची,
काळजी घेते सासरी सर्वांची..
माझ्या आत्याला,
वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा..!

Atya Birthday Wishes in Marathi
Atya Birthday Wishes in Marathi

आत्या आमची लय भारी,
शॉपिंग करते खूप सारी..
नसते तिला कशाची फिकीर,
पण माहेरच्या भेटीसाठी होते अधीर..
जीव लावते सगळ्यांना, ठेवून सर्वांचा मान,
या माझ्या आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !


Birthday Quotes for Atya in Marathi | बर्थडे कोट्स आत्या मराठी

आमची आत्या म्हणजे,
कधी नारळासारखी तर,
कधी कारल्यासारखी..
कधी प्रेमळ झरा तर,
कधी रागाचा पेटता निखारा..
तिचा असतो आम्हाला नेहमी सहारा..
अशा माझ्या बहुगुणी आत्याला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

Birthday Quotes for Atya in Marathi

बाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी,
आमची आत्या..
कितीही दुःख असले तरीही,
कोणाला न सांगणारी आत्या..
सासरी सर्वांची काळजी घेणारी आत्या..
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आत्या !


Birthday Status for Atya in Marathi | बर्थडे स्टेटस आत्या मराठी

देवा, प्रत्येक घरात,
तुझ्यासारखी आत्या असू दे..
बाबांना आधार देणारी,
तुझ्यासारखी बहीण असू दे..
आईला नव्या घरात सामावून घेणारी,
तुझ्यासारखी नणंद असू दे..
माझे सगळे लाड पुरवणारी,
तुझ्यासारखी आत्या असू दे..
हीच आहे देवाकडे इच्छा..
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Status for Atya in Marathi

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.