Happy Birthday Wishes for Kaka in Marathi | काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes Kaka in Marathi

काका आज तुमच्या या वाढदिवशी
मी तुम्हाला सांगू इच्छितो की,
तुम्ही एक अद्भुत व्यक्ती आहात,
आणि तुम्ही आम्हाला अत्यंत प्रिय आहात..
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

ADVERTISEMENT

Happy Birthday Kaka in Marathi

काका आजच्या या जन्मदिवशी,
आपणास दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
Happy Birthday Kaka..


Birthday Wishes for Kaka in Marathi

आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


वटवृक्षा सारखी माया लावणारे,
आकाशाच्या उंची इतके प्रेम देणारे,
प्रत्येकाशी प्रेमाने वागणारे,
घरातील एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे काका..
कुटुंबातील प्रत्येकाशी जिव्हाळयाचे नाते ठेवणाऱ्या,
आमच्या लाडक्या काकास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


आजोंबांची छाप, वडिलांचा धाक,
आत्याचं प्रेम, आजीची माया,
एकाच व्यक्तीमध्ये दिसते..
ती व्यक्ती असते आपले काका..
माझ्या प्रेमळ काकाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

ADVERTISEMENT

स्वार्थी जगात दुनियादारी ज्यांनी शिकवली,
कोण आपले आणि कोण परके,
याची जाणीव ज्यांनी करून दिली..
आपल्या लेकरांसोबत आम्हांलाही,
तितकीच माया लावली..
अशा माझ्या लाडक्या काकांना
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !


काका, तुमच्यापासून कितीही दूर राहिलो,
तरी, तुम्ही दिलेले संस्कार कधी विसरणार नाही..
तुमच्या वरील प्रेम कधी कमी होणार नाही..
देवाकडे आहे एकच मागणं,
सुखी ठेव माझ्या काकांना,
जो पर्यंत आहेत सूर्य तारे..
आम्हां सर्वांना मिळो,
प्रेम त्यांचे सारे..
वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा काका !


आमचे काका म्हणजे, प्रेमाचा निर्मळ झरा,
शांत, संयमी स्वभावाचे किमयागार,
आम्हां भावंडांसाठी अलादिनचा चिराग,
बाबांकडे मागण्या पूर्ण करून घेण्याचं
हक्काचं ठिकाण..
अशा आमच्या प्रेमळ काकांना,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


शाबासकीची थाप ज्यांची आधी पडते,
कौतुकाचा वर्षाव ज्यांच्याकडून होतो,
काही चुकल्यास कान उघाडणीही होते,
बाबांच्या मारा पासून जे नेहमी वाचवतात,
येता जाता हातावर खाऊसाठी पैसे देतात,
या माझ्या जिवलग काकांना,
वाढदिवसाच्या लाख मोलाच्या शुभेच्छा !


फेसबुक इन्स्टा वापरणारे,
रोजच्या रोज Status बदलणारे,
इंटनेटचा पुरेपूर वापर करणारे,
तरुणांना हि लाजवेल अशी
पर्सनॅलिटी असणारे..
आमच्यासाठी जीवाला जीव देणारे,
घरच्यांसाठी काहीही करणारे,
आमच्या लाडक्या काकास,
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !


आयुष्याची गणिते कशी सोडवायची,
हे ज्यांनी शिकवले, आज त्यांचा म्हणजे,
आमच्या लाडक्या काकांचा वाढदिवस !
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीचा आणि
निरामय आरोग्याच्या ठरावा,
हीच देवाकडे प्रार्थना..
वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा..!


मैत्रीच्या दुनियेत आहे पहिला नंबर..
वाढदिवासाला केक कापतात शंभर..
घराच्या सुखासाठी नेहमीच असतात तत्पर..
अशा माझ्या काकाला वाढदिवसाच्या,
शुभेच्छा देतो आभाळभर..
हॅपी बर्थडे काका..!


काका म्हणजे अक्ख्या घराची जान,
घरातील समारंभासाठी काकाला मान..
मित्रांच्या मैफिलीत काकांची शान..
अशा माझ्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !


घरातील घरपण टिकवून ठेवण्यासाठी,
बापा बरोबर राबणारे आमचे काका..
सरळ साधी राहणी त्यांची, अंदाज आहे निराळा..
माझ्या एका हाकेला धावून येणाऱ्या,
माझ्या काकाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !


बाबा आपल्या पाठीशी उभे असतांना,
बाबांच्या पाठीशी उभे राहून आधार देणारे..
असाच आधार कायम राहील हिच आशा,
हेच प्रेम सतत राहील हीच आकांक्षा..
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!!!


जसे प्रेम आम्हाला देत आलात,
ते सर्व प्रेम तुम्हाला मिळो..
प्रत्येक संकटात तुमची आम्हाला साथ लाभो,
प्रत्येक क्षणी प्रेमाची एक थाप नेहमी राहो..
या वाढदिवशी तुमची सर्व स्वप्न साकार होवो..!
बाबांसारखी माया लावणाऱ्या,
लाडक्या काकांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!


बाबा पेक्षा वेगळे नसणाऱ्या,
प्रत्येक संकटात पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या,
बाबांच्या प्रेमात भर टाकणाऱ्या काकांना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारे,
मनाने प्रेमळ, विचारांनी निर्मळ,
मला बाबांपेक्षा जास्त जीव लावणारे,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय काकांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


प्रत्येकाच्या आयुष्यात काका असावेच,
प्रत्येक हाकेला धाऊन येण्यासाठी..
नाती जपायला आणि धीर देण्यासाठी..
चुकत असेल तर समजावण्यासाठी..
आणि,
कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी…
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!


कधी मित्र तर कधी मुलगा म्हणून,
मज लावतात प्रेमाचा लळा..
आजच्या या शुभप्रसंगी आपणास,
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हजार वेळा..!
हॅपी बर्थडे काका..!