Mulacha Vadhdivas | Birthday Wishes for Son | मुलाचा वाढदिवस शुभेच्छा

आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो… कीर्तिवंत हो..
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!


Birthday Wishes for Son in Marathi

माझ्या प्रिय मुलाचे आयुष्य नेहमी सुखाचे,
समृद्धीचे आणि आनंदाचे जावो,
प्रत्येक सुख तुला मिळो,
तुझ्या चेहर्‍यावर नेहमी हास्य राहो..
तुझ्या वाढदिवशी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो..
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!


वाचा मराठी बर्थडे विशेषBday Wishes in Marathi

Son Birthday Wishes in Marathi

तुझ्या प्रयत्नांच्या पंखांनी नेहमी झेप घ्यावी..
यशाच्या आकाशात तुझी उंच भरारी असावी..
प्रत्येक प्रयत्न तुझा यशस्वी राहो,
आशीर्वाद आमचा सतत तुझ्या सोबत राहो..
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes for Son in Marathi

माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तुझ्या वाढदिवशी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो..
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येवो, हीच अपेक्षा..!


Birthday Wishes from Mother to Son in Marathi

तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर कधी दुःख येऊ नये,
आनंद तुझ्या आयुष्यात कधी कमी पडू नये..
सुख, समृद्धी, आरोग्य हे सर्व तुला मिळो,
आयुष्यात कशाची चिंता असू नये..
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..!


Birthday Wishes for Son in Marathi Text

दुःखाची तुझ्यावर सावलीही नको,
सुखाची सतत छाया असू दे..
भरभराटीचे राहो आयुष्य तुझे,
अश्रुंना कुठेच जागा नसू दे..
माझ्या प्रिय मुलाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Birthday Wishes for Son from Father in Marathi

तुझे आयुष्य आनंदाने भरुन राहो,
तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश येवो,
तू नेहमी हसत राहो,
आणि दुःख कायम दूर राहो..
माझ्या लाडक्या मुलाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Birthday Status for Son in Marathi

असेच राहो नाते आपले प्रेम आणि जिव्हाळ्याचे..
आई-बाबा पेक्षा जास्त जवळचे असणारे मैत्रीचे..
माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes in Marathi for Son

कायम तुझ्या आयुष्यात यश असू दे,
प्रत्येक दिवस नाही तर प्रत्येक क्षण तुझा आनंददायी असू दे..
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..!
Happy Birthday My Son!


Mulacha Birthday Wishes in Marathi

आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात खास आहे..
तुझे आयुष्य असेच आनंदाने फुलत राहो,
हीच मनी आस आहे..
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


मुलाचा वाढदिवस शुभेच्छा

कधी माझे बोट धरून चालणारा मुलगा
मला आधार द्यायला लागला, कळलेच नाही..
कधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारा मुलगा,
बाबा, तुम्हाला काही हवंय का विचारायला लागला, कळलेच नाही..
कितीही मोठा झाला तरी,
माझ्यासाठी माझा बाळच असणाऱ्या माझ्या मुलाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.