Vasubaras Wishes Greetings Quotes & Images in Marathi

या वर्षी वसुबारस / Vasubaras हा दिवस १ नोव्हेंबर २०२२ रोजी येत आहे. या सणाला ( गोवत्स द्वादशी / Govatsa Dwadashi ) असेही म्हंटले जाते.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशी ला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. असे मानले जाते कि या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचे फळ मिळते. गाईमध्ये अनेक देवतांचा वास असल्याने तिच्या पूजनाने संतान सुख तसेच घरात सुख समृद्धी लाभते.

दिवाळीचा पहिला दिवस वसु बारस म्हणून साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. शेतकरी कुटुंब या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गाईच्या पायावर पाणी शिंपडून तिला हळद-कुंकू अक्षता वाहून तिला ओवाळले जाते. केळीच्या पानावर पुरणपोळीचा प्रसाद वाढून गाईला खाऊ घातला जातो. या पहिल्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायची सुरुवात होते. लहान मुला बाळांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी देखील ही पूजा केली जाते.

ADVERTISEMENT

वसुबारस सणासाठी खास शुभेच्छापत्रे Vasubaras Wishes in Marathi आम्ही खाली सादर करत आहोत, तुम्ही त्याचा आपल्या मित्र आप्तेष्टाना शुभेच्छा देण्यासाठी वापर करू शकता.


वसुबारस शुभेच्छा मराठी | Vasubaras Wishes in Marathi

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!

Vasubaras Marathi Wishes

ADVERTISEMENT

वसुबारस शुभेच्छापत्र मराठी | Vasubaras Greetings in Marathi

Vasubaras Greetings Marathi


वसुबारस कोट्स मराठी | Vasubaras Quotes in Marathi

Vasubaras Quotes in Marathi


वसुबारस शुभेच्छा फोटो | Vasu Baras Images in Marathi

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Vasubaras Images in Marathi


वसुबारस संदेश मराठी | Vasubaras Shubhechha SMS in Marathi

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!

Vasubaras Shubhechha Marathi

वसुबारस शुभेच्छा फोटो


वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा | Vasubaras Chya Hardik Shubhechha

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
शुभ सकाळ!


विनंती: धन्यवाद हा लेख वाचल्याबद्दल. या लेखातील वसुबारस शुभेच्छा / Vasubaras Marathi Wishes तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका.


Diwali First Day Wishes in Marathi

वसुबारस – दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!  शुभ दीपावली..!


Vasubaras Quotes in Marathi | वसुबारस कोट्स इन मराठी

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस 😊 निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! 🙏🙏


स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा..!


दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!


वसुबारस रांगोळी | Vasubaras Rangoli

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची रांगोळी


वसुबारस सणाची माहिती मराठी | Vasubaras Information in Marathi

Vasu Baras in Marathi – या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे, ज्या वेळी देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत शोधण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी दैवी शक्ती असलेली कामधेनू गाय सात महान देवांकडून देणगी म्हणून उत्पन्न झाली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण याशी संबंधित आहे. दैवी प्राणी हे भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू अवतार यांच्याशी जवळून संबंधित आहे. स्वर्गात राहणारी ही दैवी गाय देवांनी सात ऋषींना (सप्त ऋषींना) दिली आणि कालांतराने ती वसिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली. तिच्यात तिच्या मालकाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. असे मानले जाते की वसुबारसच्या दिवशी गायीतून चैतन्य-भरलेल्या लहरींचे विष्णूच्या रूपात उत्सर्जन होते. म्हणून, या दिवशी जे गाईची पूजा करतात ते विष्णूने उत्सर्जित केलेल्या या लहरींना स्वतःकडे आकर्षित करून त्याचा लाभ घेऊ शकतात.


Vasubaras Pahila Diwa Shubh Sakal

नवीन महिन्याच्या पहिली सकाळ,
आणी दिवाळीच्या पहिल्या दिव्याच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दिपावली..!

दिवाळीचा पहिला दिवस शुभेच्छा