Dhantrayodashi Wishes Greetings Quotes & Images in Marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा 2022

Dhantrayodashi Wishes in Marathi | Happy Dhanteras Wishes in Marathi

Dhantrayodashi Wishes in Marathi 2022 : दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. दिवाळीच्या २-३ दिवसाआधी त्रयोदशीला हा सण येतो. यावर्षी धनत्रयोदशी हि २२ नोव्हेंबर २०२ रोजी येत आहे. सोने चांदी तसेच वस्त्र खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो कारण दक्षिण हि यमाची दिशा आहे. दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याचा देवता धन्वंतरि आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देवता कुबेर याची पूजा केली जाते.


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

या दिवशी एकमेकांना धनत्रयोदशी निमित्त शुभेच्छा दिल्या जातात. या पानावर आम्ही धनत्रयोदशी सणानिमित्त शुभेच्छा सादर करत आहोत. तुम्ही त्या टेक्स्ट किंवा फोटो माध्यमातून शेयर करू शकता. आणि तुमच्याकडेही अश्याच धनत्रयोदशी शुभेच्छा /Dhantrayodashi Wishes in Marathi असतील तर त्या कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका, आम्ही त्या या पानावर नक्की समाविष्ट करू.


धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी | Dhantrayodashi Wishes in Marathi

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..

Dhantrayodashi Wishes in Marathi

धनत्रयोदशी संदेश मराठी | Dhantrayodashi SMS Marathi

Dhantrayodashi SMS Marathi

धनत्रयोदशी शुभेच्छा फोटो | Dhantrayodashi Images in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..

ADVERTISEMENT
Dhantrayodashi Images Marathi

धनत्रयोदशी कोट्स मराठी | Dhantrayodashi Quotes Marathi

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Dhantrayodashi Quotes Marathi

धनतेरस शुभेच्छा मराठी | Dhanteras Wishes in Marathi

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

Dhantrayodashi Shubhechha

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Shubhechha

आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

धनत्रयोदशी शुभ सकाळ | Dhantrayodashi Shubh Sakal Image

धनत्रयोदशी शुभ सकाळ

Happy Dhanteras Wishes in Marathi | शुभ धनतेरस

धनत्रयोदशीने होते सुरुवात,
आज या दीपपर्वाची..
समस्त मित्रपरिवारांना,
ही दिवाळी जावो सुख-सम्रुद्धीची..
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा..!


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो..
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो..
आप्तेष्ठांची सदैव साथ असो..
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो..
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!


धनत्रयोदशी म्हणजे काय? धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला समुद्र मंथनाच्या वेळी अमृतकलश घेऊन धन्वंतरी देव प्रकट झाले होते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे नाव पडले. या दिवशी धनप्राप्तीसाठी धनाची देवता कुबेर, आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याची देवता धन्वंतरी आणि अपमृत्यू टाळण्यासाठी मृत्यूची देवता यम यांची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी २०२१ स्पेशल शुभेच्छा कश्या द्याल?

यासाठी तुम्ही आमच्या वरील लिंक ला भेट देऊन धनत्रयोदशी शुभेच्छा संग्रह पाहू शकता आणि त्या टेक्स्ट किंवा फोटो माध्यमातून शेयर करू शकता.

धनत्रयोदशीचे महत्व काय आहे?

धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जयंती चा आहे, कारण याच दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात. प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांसोबत साखर खाण्यास देतात. यामागे मोठा अर्थ आहे. कडुनिंबाच्या झाडाची उत्पत्ती हि अमृतापासून झाली होती. म्हणून कडुनिंब एक औषधी वनस्पती नवीन जीवनदान देणारी आहे. रोज सकाळी कडुनिंबाची ४-५ पाने खाल्ली तर कोणतीच व्याधी उद्भवत नाही. म्हणून धन्वंतरी देवाचा प्रसाद म्हणून या दिवशी कडुलिंबाच्या पानांना खूप महत्व आहे.

यमदीपदान म्हणजे काय?

याच दिवशी यमदीपदान हि आहे. यम हा मृत्यूचा देवता आहे. मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही, आणि मृत्यूची भीती हि सर्वाना आहेच. या दिवशी यमाला दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा दिवा लावला असता अकाल मृत्यूचे भय निघून जाते. यमाला दिवा लावताना अशी प्रार्थना करावी कि. हे यमदेवता सूर्य पुत्रा, हा दीप मी तुला अर्पण करत आहे. माझे अकाल मृत्यूपासून रक्षण करावे. चांगले आरोग्य द्यावे अशी विनंती करतो. असे म्हणून यमदेवताला यमदीपदान करावे व नमस्कार करावा.