Navra Bayko Ani Maher Joke

बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता? जे काय बोलायचं ते मला बोला.. ☺ ☺ नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का? शिव्या तर कंपनीलाच देतो ना… ☺☺☺

Vadil Mulga Ani Result Joke

वडील: उद्या Result आहे ना रे? मुलगा: हो.. वडील: जर का नापास झालास तर, तुझा माझा संबंध संपला.. दुसऱ्या दिवशी, वडील: काय आला रे Result? मुलगा: तु कोण रे मला विचारणारा? ☺☺☺

Hyala Mhantat Badla

ह्याला म्हणतात बदला!!! मी तिला ३-४ वेळा फोन केला पण तिने उचलला नाही.. नंतर तिला एकच Message केला, “Balance” आला का? ५०० ला ५०० Full Talk Time! तिने आत्तापर्यंत २० वेळा फोन केला पण मी उचलला नाही.. चुकीला माफी नाही…

Eka Anolkhi Mulacha Phone

मुलीला एका अनोळखी मुलाचा फोन येतो.. मुलगा : तुला Boyfriend आहे का? मुलगी : हो पण आपण कोण बोलताय? मुलगा : मी तुझा भाऊ बोलतोय. तू घरी ये मग सांगतो.. थोडया वेळाने परत मुलीला फोन येतो, मुलगा : तुला बॉयफ्रेंड आहे का? मुलगी : नाही पण आपण कोण बोलताय? मुलगा : मी तुझा Boyfriend बोलतो आहे, आज तू माझं हृदय तोडलं आहे.. मुलगी : नाही रे माझ्या सोन्या, काही वेळापूर्वी भावाचा फोन आला होता, म्हणून अशी बोलले.. मुलगा : आताही तुझाच भाऊ बोलतो आहे, आता तर तू मेलीच. ये घरी तू…