भांडण झाल्यानंतर, माझं तुझ्याशी अबोला धरणं,
ही शिक्षा तुला असते की मला, हेच मला समजत नाही..
तुझ्याशी बोलणं सोडलं की, खरं सांगू..
यार मला करमतच नाही..!
भांडणं होतात..
दुरावा येतो..
मतभेद होतात..
राग येतो..
पण हे सगळं विरघळतं,
जर प्रेम पक्कं असेल तर…!
भांडणं घरातली असो वा समाजातली
त्याचा परिणाम इतर लोकांवर सुद्धा होतो,
त्यामुळे दोन जणांची आपापसातील भांडण थांबवायची असेल
तर दोघातून एकाला तरी शांत व्हायला पाहिजे,
तर भांडण आपोआप कमी होईल..
आणि समोरचा शांत होईल याची वाट बघू नका,
स्वतः माघार घ्या…
क्षणभराचंच भांडण ना ते,
मग का घाव जन्मभराच्या नात्यावर..
अहो कुणी दात पाडून टाकतं का,
जीभ त्याखाली आल्यावर..
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त…
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त…!!
कधी वाटतं तुला समजावणं खूप कठीण आहे,
त्यापेक्षा तुला समजून घेणंच ठीक आहे..
तू आहेस हट्टी पण प्रेम ही करतेस तितक्याच टोकाने,
म्हणूनच सामावून घेतो रागाला तुझ्या मी प्रेमाने..
किती वेडं असतं ना आपलं मन,
ज्या व्यक्तीशी खूप भांडतो,
ज्या व्यक्तीवर खूप चिडतो,
तरी सुद्धा त्याच व्यक्तीशी बोलायची इच्छा होते…
भूक तरी कशी लागणार आपल्याच माणसाने रुसल्यावर,
घास तरी कसा गळ्यातून उतरणार सोबत कुणी नसल्यावर..
दोन क्षणाचा वाद नाही,
कित्येक क्षणांचा सहवास आठवणीत ठेवावा,
कधी वाटलं खूप ताणलय नात्याला,
तर लगेच आपला राग बाजूला सारावा..