आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेसच्या मागे एक गाढव मरून पडलं होतं,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला,
“मग आम्ही काय करू” पलीकडून उर्मट प्रश्न आला..
“तुम्ही काही करू नका” अत्रे शांतपणे म्हणाले, “मृतांच्या नातेवाईकांस
कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढंच”