रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rakshabandhan Shubhechha Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा भावासाठी बहिणीसाठी

रक्षाबंधन – बहीण भावाच्या प्रेमाचा सण

कधी रागावणारा, कधी हसवणारा कधी भांडणारा तर कधी काळजीने जवळ घेऊन चिमटा काढणारा भाऊ तर तशीच थोडीफार त्याच्याच पायावर पाय ठेवून वागणारी ताई. खरचं भाऊ-बहिणीचे हे नाते विलक्षण आहे. रक्षाबंधनाचा सण आला कि, हे नाते अजून बहरून येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण भारतभर साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचा, स्नेहाचा, जबाबदारीच्या ऋणानुबंधांचा हा सण आहे. यादिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून आपल्या रक्षणाचे वचन घेते आणि भाऊ सुद्धा आपले कर्तव्य जोपासणार असे बहिणीला वचन देतो. बहिण भावाला रक्षण करायला सांगते म्हणून ती दुबळी ठरत नाही तर भावाच्या कर्तुत्वावर तिचा विश्वास असल्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन आहे.

ADVERTISEMENT

Rakshabandhan Chya Hardik Shubhechha!

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !Rakshabandhan Chya Hardik Shubhechha

रक्षाबंधन का साजरे केले जाते? रक्षाबंधनाच्या आख्यायिका.

रक्षाबंधनाविषयी अनेक पौराणिक कथा आहे. देव आणि दानवांचे युद्ध सुरु होते. त्यावेळी इंद्रदेव युद्धामध्ये हरण्याचे चिन्ह दिसू लागले. अशावेळी इंद्राची पत्नी शची हिने मंत्राचा उच्चार करून एक रेशमी धागा इंद्राच्या मनगटावर बांधला तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. इंद्र ते युद्ध जिकंले आणि तेंव्हापासून रक्षाबंधनास सुरुवात झाली असल्याची आख्यायिका आहे. बळी राक्षसाने विष्णू देवाला कैद केले त्यावेळी लक्ष्मी मातेने बळीराजाला राखी बांधून विष्णू देवाची सुटका केली. यामुळे मोठा नरसंहार थांबला म्हणजेच काय तर राखी हि शांततेची प्रतीक सुद्धा आहे. राजस्थानच्या इतिहासातही रक्षाबंधनाच्या कथा वाचायला मिळतात, हुमाँयू बादशहाला चित्तोडगडाची राणी कर्मवतीने राखी पाठवली होती. ती राखी पाहून हुमाँयू बादशहाला मनोमनी राखीचे महत्त्व समजले आणि त्यांनी शत्रूच्या आक्रमणापासून चित्तोडगडाचे रक्षण केले. यावरूनच आपल्याला राखीचे महत्त्व किती अनमोल आहे याची प्रचिती येते.

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे..
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं,
अलवार स्पंदन आहे…
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

Raksha Bandhanachya Shubhechha Bhavakadun Bahinisathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhanachya Shubhechha Bhavakadun Bahinisathi

देवराखी का म्हंटले जाते?

रक्षाबंधन साजरा करतांना फक्त भावालाच राखी बांधली जाते असे नाही बरं का ! तर देवांना देखील राखी बांधली जाते. म्हणूनच या राखीला देव राखी असेही म्हणतात.

ADVERTISEMENT

आजच्या दिवशी घरातील कुलदैवत आणि देव्हाऱ्यातील देवांना हि देवराखी बांधली जाते. त्यामागची भावना देखील संरक्षणाची आहे. देवाला राखी बांधून, देवाकडे असे मागितले जाते कि, येणाऱ्या प्रत्येक संकटातून तू माझे रक्षण कर.

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,
राखी एक विश्वास आहे,
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी
मी तुला देऊ इच्छितो..
Happy Rakshabandhan!

ताईला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

Taila Rakhi Pornimechya Shubhechha

Marathi Rakshabandhan Status

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!Marathi Rakshabandhan Status

रक्षाबंधन आणि भद्राकाळ अनोखे समीकरण

आपल्या भारतीय परंपरेत प्रत्येक सण, व्रत वैकल्य करतांना मुहूर्त बघून मगच पूजा केली जाते. रक्षाबंधन सणाचा देखील मुहूर्त असतो. दिलेल्या मुहूर्तामध्ये बहिणीने भावाला राखी बांधली पाहिजे. राखी पौर्णिमेचा मुहूर्त पाळण्यामागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते कि, भद्राकाळ संपल्यावरच राखी बांधली पाहिजे. भद्रा हि शनी देवाची बहीण असून, तिची दुर्ष्टी हि नुकसानदायक ठरते. रामायणात असा उल्लेख आहे कि, शूर्पणखेने रावणनाला भद्रकाळ सुरु असतांना राखी बांधली होती. त्यामुळे त्याचा सर्वनाश झाला म्हणून भद्रकाळ सुरु असतांना राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्त मानला जात नाही.

रक्षाबंधन चारोळी

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

Rakshabandhan Charoli

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

ऋणानुबंधनाचे नाते – रक्षाबंधन

मराठी सणामध्ये प्रेमाचा, संरक्षणचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. या सणाची मज्जाच काही निराळी आहे. लहान बहीण असली तर तिचे हट्ट पुरवण्यासाठी दादा नेहमी आपल्या परीने प्रयत्न करत असतो तर मोठ्या बहिणीकडे दादाची कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी तक्रार सुरु असते. हे नातेच असे आहे कि या नात्यात रागावणे, भांडणे चिडवणे, डिवचने, काळजी, प्रेम, जिव्हाळा आहे. लग्नाच्या आधी तुझ्या – तुझ्या हक्काच्या घरी जा म्हणणारा भाऊ तिच्या लग्नात धाय मोकलून रडत असतो तर दादाची लाडकी चिमणी सासरच्या घरी कसं काय सामावून घेईल या विचाराने त्याची झोप उडालेली असते. ताईच्या डोक्यात आपण सासरी गेल्यावर माझ्या भोळ्या भाबड्या भावाचे कसे होईल याची चिंता तिला सतावत असते. म्हणूनच तर म्हणतात कि ज्या घरात बहीण भावाचे प्रेम आहे ते घर बालगोपाळांचे आहे.

Rakshabandhnachya Shubhechha Tai Bahinisathi

ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो…
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

Rakshabandhnachya Shubhechha Tai Bahinisathi

Rakshabandhnachya Shubhechha Bhavasathi

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Rakshabandhnachya Shubhechha Bhavasathi

काळानुरूप राखी बदलत गेली पण तिचे महात्म्य कमी झाले नाही. आजच्या युगात ही भावा बहिणीचे अतूट नाते राखीतून व्यक्त होत असते. भाऊ कितीही दूर असला, अगदी सात समुद्रापार असला तरी त्याच्यापर्यंत राखी पोहचवण्यासाठी बहिणीचे पराकोटीचे प्रयत्न सुरु असतात. राखी म्हणजे हा केवळ एक धागा नसून बहीण आणि भावाच्या प्रेमाचे, विश्वासाचे, सचोटीचे, वचनांच्या पूर्ततेच्या ऋणानुबंधनाचे नाते आहे.

Happy Rakshabandhan Dadasathi

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !Happy Rakshabandhan Dadasathi

वाचा आणखी बरेच रक्षाबंधन शुभेच्छा संदेश आमच्या Rakshabandhan SMS Marathi या कॅटेगरी पेजवर