Tu Kadhi Bhetshil Punha
तुझी माझी भेट कदाचित, घडत राहील पुन्हा पुन्हा.. पण प्रश्न प्रश्नच राहतोय, तू कधी भेटशील पुन्हा…?
तुझी माझी भेट कदाचित, घडत राहील पुन्हा पुन्हा.. पण प्रश्न प्रश्नच राहतोय, तू कधी भेटशील पुन्हा…?
एकदा मला ना, तू माझी वाट पाहतांना पाहायचंय.. तेवढ्यासाठी आडोशाला, हळूच लपून रहायचंय…
प्रेमाचे गुंतवून धागे, दूर अशी जाऊ नकोस.. मलासुद्धा मन आहे, हे विसरून जाऊ नकोस…
डोळ्यांचे आणि मनाचे काहीतरी नाते असेल.. नाहीतर उगाच कसा कुणी डोळ्यातून जाऊन मनात बसेल…?