वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Vadhdivas Shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास असा दिवस असतो. ज्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे ‘वाढदिवस’. नवीन जबाबदारी अंगावर येणार याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. तरीही वाढदिवस म्हटले कि बर्थडे साठी सुंदर असा पोशाख, नवीन हेअर स्टाईल, फिरायला जाण्याचे ठिकाण, आवडता सिनेमा, आवडीचे जेवण असा बेत हा आधीच मनात ठरलेला असतो, आणि हे सर्व करतांना त्या प्रत्येक क्षणांची दृश्ये आपल्या मोबाइल मध्ये त्या सुंदर दिवसाची आठवण म्हणून आपल्याला कैद करायची असतात . काहीही म्हणा वाढदिवस साजरा करणे हि संकल्पना मात्र अफलातून आहे. आता आधुनिकीकरणामुळे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. फेसबुक च्या कृपने परिचितांचे वाढदिवस …

Read more

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना

आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच, पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात. तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी आजही मुख पाठ आहेत. जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत. तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे, हेच ईश्वराकडे मागणे आहे. तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा… आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा

तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे, आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे.. तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली, आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली.. तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले, माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले.. तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे.. असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे, तुम्ही नेहमीच मला समजून घेतले.. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे, हे आता मला खरं वाटायला लागलं आहे.. मी न बोलताच तुला सगळं समजतं, तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते, याचे मला नेहमीच कौतुक वाटते.. तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे, तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे.. तू इतकी कसं काय सांभाळते? तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते, चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते.. तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!