वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबांना

बाबा तुमच्यामुळे मी आज येथे आहे तुम्ही रात्र-दिवस माझ्या भविष्यासाठी झटले तुमच्या कष्टातून माझे आनंदवन फुलले मला एक चांगले जीवन लाभले तुमच्या मेहनतीने हे सारे घडले चंदन रुपी देह माझ्यासाठी झिजवला दिवा होऊन माझ्यातला अंधकार विझवला तुमचे आरोग्य अक्षय राहो हीच सदिच्छा… बाबा तुम्हांला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

आईला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे, किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला वळण दिले हाताचा पाळणा करून मला वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले. किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा, हेच आता देवाकडे मागणे आहे.. आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन तू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन आई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत कठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत तूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त, तुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं… तुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा, दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

बहिणीला भावाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईच्या मायेला जोड नाही ताईच्या प्रेमाला तोड नाही मायेची सावली आहेस तू घराची शान आहेस तू तुझं खळखळत हास्य म्हणजे आई बाबांचे सुख आहे तू अशीच हसत सुखात राहावी हीच माझी इच्छा आहे… वाढदिवसाच्या तुला भरभरून शुभेच्छा !