मैत्रिणीकडून मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा सहवास माझ्यासाठी किती मौल्यवान आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे, तुझ्या प्रेमाचा हात असाच माझ्या पाठीवर राहू दे भरभरून यश तुझ्या पदरी पडू दे, आपल्या मैत्रीचे कौतुक जगभर पसरू दे हा वाढदिवसाचा सोहळा असाच येऊ दे.. तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Mitra

मित्र असावा तुझ्यासारखा, स्वतःच्या घासातला घास देणारा.. मित्र असावा तुझ्यासारखा, वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा, मित्र असावा तुझ्यासारखा, वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा.. खूप आले आणि खूप गेले, पण मित्रा हृदयात घर तू केले.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं नातं खास आहे, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील, पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील, तुझे रुसणे फुगणे मला आवडते, त्यातूनच तुझे माझे नाते फुलते, हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | वाढदिवस शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे आजकाल खूप महत्वाचं झालंय, प्रत्येक जण नवीन आणि छान अश्या वाढदिवस शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तीला, मित्राला, भावाला, बहिणीला, आईला बाबांना देण्यासाठी social मीडिया चा वापर करत आहे. अश्याच काही निवडक वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी इथे संग्रहित केल्या आहेत. [pt_view id=”67c6afeg7i”]