वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | वाढदिवस शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे आजकाल खूप महत्वाचं झालंय, प्रत्येक जण नवीन आणि छान अश्या वाढदिवस शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तीला, मित्राला, भावाला, बहिणीला, आईला बाबांना देण्यासाठी social मीडिया चा वापर करत आहे. अश्याच काही निवडक वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी इथे संग्रहित केल्या आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
प्रिय बाबा,
आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं
हे खरं आहे..
पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन,
की एक दिवस,
हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…
खरंच बाबा,
केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात
हे यश आहे!
आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी | Vadhdivsachya Funny Shubhechha
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात…
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे…
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो…
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
- 1
- 2
- ›