Tu Sobat Asavi He Have Hote Mala

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला, तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला, तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला…

Aaple Dukh

आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते, आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…

Aayushyat Pratyek Kshan Ha Amulya Ahe

फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते, आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…

Daaru Pilyavar Mitranche 11 Suprasidhha Dailogue

दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलॉग : १. तू माझा भाऊ आहेस… २. भाऊड्या गाडी मी चालवणार… ३. मी तुला मनापासून मानतो आ !! ४. येड्यांनो एवढी दारू कमी पडणार, हाफ पाहिजे आजुन… ५. मी काय चिंधी आहे काय !! ६. भाऊ असे समजु नको की मी पिऊन बोलतोय… ७. १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे… ८. तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे… ९. तुझ्यासाठी मी जीवपण द्यायला तयार आहे !! १०. आज ती असती तर हि हालत झाली नसती यार… ☺ ☺ And The Best Line ☺ ☺ ११. उद्या पासून दारू बंद……!!