Diwali Wishes & Images Collection Marathi

दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला…
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा…!

मराठी दिवाळी संदेश | Marathi Diwali Sandesh

नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावली ही आली…
नवस्वप्नांची करीत पखरण,
दीपावली ही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावली ही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावली ही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

दिवाळी निमित्त शुभेच्छा

अश्विनची नवी सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास,
दीपावलीची हीच तर खरी सुरवात,
म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!