Happy Diwali Wishes in Marathi ( दिवाळीच्या शुभेच्छा ). We always update Diwali Wishes in Marathi in this category so you will get the Latest & New Diwali Quotes in Marathi. Send Marathi Diwali Images to your friends & Wish them a Happy Diwali. Enjoy our Best Diwali Marathi Messages Collection & Share Dipawali Greetings in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends & Say Shubh Diwali or Happy Diwali to your Loved One.
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! दिवाळी या सणाला दीपावली किंवा दिपवाळी असे देखील म्हंटले जाते. तुम्ही जर दिवाळी SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच दिवाळी संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी दिवाळी शुभेच्छा, Diwali Wishes Marathi, दीपावली शुभेच्छा चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
शुभ दीपावली!
Happy Diwali Marathi Wish
माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali!
आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा ❤️ यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ✨ आपल्याला मिळत राहो! 🙏आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Images in Marathi 2022
आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
🙏दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Messages in Marathi 2022
सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं ❤️ लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया.. 🙏पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
🙏नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!🙏
Diwali padwa images in marathi hd
Diwali Padwa Status in Marathi 2022
आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळी पाडवा पावन दिवशी
सगळ्यांना ❤️ शुभेच्छांचा उपहार.
🙏दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Chya Hardik Shubhechha in Marathi 2022
Diwali Padwa Banner in Marathi 2022
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
🙏दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏
Diwali padwa greetings marathi 2022
लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी पाडवा तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!
🙏शुभ दीपावली पाडवा 2022.🙏
Diwali padwa wishes in marathi for wife
शुभ दिवाळी पाडवा | Happy Diwali Padwa 2022
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,
असाच राहो नात्यातला गोडवा.. 🙏शुभ दिवाळी पाडवा!🙏
दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा [ HAPPY DIWALI ] मित्रांनो! आम्ही या लेखामध्ये तुमच्यासाठी दिवाळीची संपूर्ण माहिती तसेच सुंदर शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या लेखातील माहिती शाळेतील मुलांना दिवाळी निबंध लिहण्यासाठी उपयोगात येऊ शकेल. दिवाळीसाठी खास वसु बारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या पाचही दिवसांच्या शुभेच्छा इमेजेस ( Diwali Wishes in Marathi) आम्ही येथे संग्रहित केल्या आहेत. आवडल्यास डाउनलोड करून तुमच्या मित्रांना दिवाळी शुभेच्छा द्यायला विसरू नका.
आपले स्वागत आहे.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!या लेखाच्या शेवटी दिवाळीचे नवीन संदेश दिलेले आहेत ते नक्की वाचा.
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, 🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
दिवाळी कोट्स मराठी | Diwali Quotes in Marathi
स्नेहाचा सुगंध दरवळला.. आनंदाचा सण आला.. एकच मागणे दिवाळी सणाला.. सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना.. 🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏
सण हिंदु धर्माचा एक दिवा लावु जिजाऊ चरणी एक दिवा लावु शिवचरणी एक दिवा लावु शंभु चरणी आमचा इतिहास हिच आमची प्रतिष्ठा… ⛳दिपावलीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा..!⛳
दिवाळी असे नाव का पडले?
दिवाळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला घराबाहेर अनेक दिवे लावले जातात, दारात रांगोळी काढली जाते, अंगणात कंदील लावला जातो. काही लोकांचा असा समज आहे कि रामाने चौदा वर्षांचा वनवास संपवून तो सीतेला घेऊन अयोध्येला परत आला तेव्हा दिवे लावून लोकांनी त्याचे स्वागत केले म्हणून दिवाळी असे नाव पडले. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दिवाळीच्या सायंकाळी दारा मध्ये दिवे लावून रांगोळ्या काढल्या जातात. लहान मुले मातीचा किल्ला तयार करून त्यावर मातीपासून बनवलेली रंगबिरंगी अशी खेळणी मांडतात. दिवाळीच्या पाचही दिवसाचे विशेष असे वेगळे महत्त्व आहे.
शुभ दिवाळी संदेश | Shubh Diwali Sandesh
धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.. 💥शुभ दिवाळी!💥
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी. 🙏शुभ दिपावली..! 🙏
दिवाळी निमित्त शुभेच्छा | Diwali Nimitt Shubhechha
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! 💫दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !💫
आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपल्या घरी, तनामनावर बरसत राहो चैतन्याच्या सरी, सौख्य, संपदा, समृध्दीला नुरो कदापी उणे दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे हेच एक मागणे.. 🙏Happy Diwali 2022.🙏
दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, ✨दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा .✨
Diwali Nimitt Shubhechha
शुभ दीपावली संदेश | Shubh Deepavali Sandesh
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…! ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨
आनंद घेऊन येतेच ती, नेहमीसारखी आताही आली.. तिच्या येण्याने मने, आनंदाने आनंदमय झाली.. सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून, 💥😊आनंदाची शुभ दिपावली..😊💥 🧨🙏Happy Diwali 🙏🧨
Shubh Deepavali
शुभ दीपावली | Shubh Dipawali
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी, खरोखरच अलौकिक असुन, ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान, आणि वैभवाच्या दीपमाळांनी, जीवन लखलखीत करणारी असावी… ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात, सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ. हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो. 🧨Happy Diwali 2022.🧨
शुभ दिपावली | Shubh Deepavali
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली.. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली.. सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली.. शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.. 💥दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!💥
आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.. 💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💫
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा. 🙏शुभ दीपावली.🙏
अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी 💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💫
दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Diwali Message in Marathi
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.. ✨दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!
रंगीबेरंगी रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी फराळाचा घमघमाट पाहुण्यांची रेलचेल म्हणजेच दिवाळी नव्हे तर नात्यातील सैल झालेली वीण पुन्हा घट्ट करणे होय. 🏮Happy Diwali 2022.🏮
हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया. 🙏शुभ दिवाळी २०२२.🙏
दिवाळी शुभेच्छा मराठी | Diwali Wishes Marathi
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… 🙏* शुभ दिपावली *🙏
थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर. तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा… आम्हा सगळ्यांकडून 💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💫
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. 💫हॅपी दिवाळी २०२२.🔥
दिवाळी शुभेच्छापत्र मराठी | Diwali Greetings Marathi
दिवाळीचा पहिला दिवस वसु बारस म्हणून साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. शेतकरी कुटुंब या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गाईच्या पायावर पाणी शिंपडून तिला हळद-कुंकू अक्षता वाहून तिला ओवाळले जाते. केळीच्या पानावर पुरणपोळीचा प्रसाद वाढून गाईला खाऊ घातला जातो. या पहिल्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायची सुरुवात होते. लहान मुला बाळांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी देखील ही पूजा केली जाते.
वसुबारस शुभेच्छा मराठी | Vasubaras Wishes Marathi
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. 🙏दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा..!🙏
दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. दिवाळीच्या २-३ दिवसाआधी त्रयोदशीला हा सण येतो. सोने चांदी तसेच वस्त्र खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो कारण दक्षिण हि यमाची दिशा आहे. दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याचा देवता धन्वंतरि आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देवता कुबेर याची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी | Dhantrayodashi Wishes in Marathi
आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! 💫धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!💫
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ..!
यानंतर चा तिसरा दिवस आहे नरकचतुर्दशी. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. पहाटे लवकर उठून आपल्यातील राक्षसी विचारांचा तसेच अहंकाराचा नायनाट करायचा हा दिवस आहे. या दिवशी अभयंगस्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते सकाळी लवकर उठून सुवासिक उटणे व तेलाचे मर्दन करून स्नान केले जाते. सूर्योदयापूर्वी स्नान केले जाणे म्हणजेच अभयंगस्नान. या दिवशी पहाटेपासून फटाके फोडायला सुरवात होते ती भाऊबीजेला संपते.
Narak Chaturdashi Wishes in Marathi
नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनि स्मरावे श्रीकृष्णाला.. ✨नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨
अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात. संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतांना पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर सुबक असे कापड ठेवून त्यावर नारळ आणि कलश तसेच घरातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि काही पैशांची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी घराची साफसफाई करण्यासाठी लागणारी केरसुणी ही नवीन विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिची हळद कुंकू लावून लक्ष्मीपूजनानंतर घरात वापरण्यास सुरुवात केली जाते.
Lakshmi Pujan Wishes in Marathi
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. या दिवसाला दिवाळी पाडवा देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त म्हणून देखील या दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. बळीराजाचे रांगोळी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी बळीराजाची मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते तर काही ठिकाणी शेणाचा बळीराजा करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा. बळीराजाच्या पूजनाचा हा दिवस आहे. जमा खर्चाच्या नवीन वह्या सुरू करण्यासाठी देखील व्यापारी लोक या दिवसाला शुभ मानतात.
Balipratipada Wishes in Marathi
आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा.. 🙏शुभ दीपावली!🙏
भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस. हा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. बहीण-भावांच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. बहीण भावासाठी गोड-धोड जेवण बनवते. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून नंतर भावाला ओवाळते. भाऊ ताटात ओवाळणी टाकून बहिणीला मान देतो.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे, फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे, नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत.. दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत.. 💫तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!
Diwali Wish In Marathi
सण आला मोठा, नाव त्याचे दिवाळी.. पाच दिवस उठायचे, लवकरच सकाळी..
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी 🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
Latest Diwali wishes in marathi 2022
श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा वर्षाव करोत दु:ख नष्ट करो, प्रेम आणि दिव्यांच्या चमकने तुमचे घर उजळेल, प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवोत! ❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️
आनंद होवो overflow मजा कधी होऊ नये Low, संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो, असा तुमचा दिवाळी सण असो! 🧨दिवाळी शुभेच्छा 2022.🔥
दिवाळी उखाणे मराठी / Diwali Ukhane in Marathi.
द्वारकेत श्रीकृष्ण , अयोध्येमध्ये राम; _ च्या पायांशी माझे चारही धाम.
सौभाग्याची जीवनज्योत प्रीततेलाने तेवते ; दिवाळीच्या दिवशी _ रावांना मी दीर्घायुष्य मागते.. 🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला…
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा…!
नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावली ही आली…
नवस्वप्नांची करीत पखरण,
दीपावली ही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावली ही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावली ही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
अश्विनची नवी सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास,
दीपावलीची हीच तर खरी सुरवात,
म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी,
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती,
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…!
!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
शुभ दिपावली..! 🙂
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी…
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा !!!
Diwali Shubhechha Marathi | दिवाळी शुभेच्छा मराठी
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!
दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
Diwali Message in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा!
दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट,
उटणी, अत्तराचा घमघमाट..
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ,
आकाश दिव्यांची झगमगाट…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
रांगोळीच्या रंगांची,
उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
हि दीपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची!
आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष
सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि
आरोग्य संपन्नतेचे जावो…
शुभ दीपावली!
सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…
Shubh Diwali in Marathi | शुभ दिवाळी इन मराठी
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…
दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Diwali Quotes in Marathi | दिवाळी कोट्स इन मराठी
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *