Konitari Panyachya Mathala Vicharle

कोणीतरी पाण्याच्या माठाला विचारले की,
बाबा तू इतका थंड कसा राहतो?
माठाने अगदी मार्मिक उत्तर दिले:
ज्याला माहित आहे की ज्याचा भूतकाळ माती व
भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व करणार?
मानवाने सुद्धा जर हेच लक्षात ठेवले तर?