Guruji Te Gurujich Astat

चार मुले कॉलेजची परीक्षा चुकवून गोवा फिरायला गेली.
खरं तर त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच हवा होता…
परतल्यानंतर प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण विचारले…
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की, माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती,
म्हणून आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो..
पण परत येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर चुकला..
प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली..
पण (खरा ट्विस्ट तर पुढे आहे.) प्राचार्यांनी त्या चार मुलांची परत परीक्षा घ्यायचं जाहीर केले.
परीक्षेच्या दिवशी चारही मुलांना चार वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या..
प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण,
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते…

प्रश्न 1) गाडीचा कोणत्या बाजूचा टायर फुटला होता? 1 मार्क
प्रश्न 2) गाड़ी कोणती होती?? 1 मार्क
नोट:- सर्वांचे उत्तर सारखे आल्यास 99 मार्क्स!!!!
गुरूजी ते गुरूजीच असतात… गुरूजीचा नाद करायचा नाही..
2G आले, 3G आले, 4G आले, हजारG येतील पण,
गुरूG शिवाय पर्याय नाही…
☺☺☺

Leave a Comment