Acharya Atre Joke

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेसच्या मागे एक गाढव मरून पडलं होतं, एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला, “मग आम्ही काय करू” पलीकडून उर्मट प्रश्न आला.. “तुम्ही काही करू नका” अत्रे शांतपणे म्हणाले, “मृतांच्या नातेवाईकांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढंच”

Ticha Phone Aala

तिचा फोन आला, खुप अकडुन ती म्हणाली, विसरुन जा मला… मी म्हणालो, आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?

Bayko: Majhi Ek Ut Aahe

बायको: माझी एक अट आहे, नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार, नवरा: माझी पण एक अट आहे, बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…

Navra Bayko Lottery Joke

नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… ☺ ☺ नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ…