Mulga Mulgi Joke Marathi

मुलगा मुलीच्या घरी तिला ‘पाहायला’ गेला आहे, (आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना ‘एकटे’ सोडतात) मुलगी : तुम्ही काय करता? मुलगा (मिश्किल स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्न विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो…) तुम्हाला काय येतं? मुलगी (मिश्कीलपणे): घाम!!!! मुलगा (चपापतो, सावरतो) : अन, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का? मुलगी : हो.. मुलगा : मग गाऊन दाखवा ना! मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!! मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे! (मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते, आणि तो बेशुद्ध पडतो…

Congress Jhindabad Joke

एक गरीब माणूस मासा पकडून आणतो, पण बायको त्याचे कालवण करू शकत नाही.. कारण, घरात गॅस नाही, वीज नाही आणि ऑईल हि नाही.. मग हा माणूस माशाला नेऊन परत नदीत सोडतो, तेव्हा मासा पाण्यातून वर येतो आणि ओरडतो, काँग्रेस झिंदाबाद, पुन्हा एकदा ५ वर्षे…!

Ajoba Ani Banya Joke

आजोबा: बन्या जरा माझी कवळी आन. बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये! आजोबा: माहितीये रे… समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे!

Daruchya Dukanache Vastushastra

एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की: दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल??? . नाल्याजवळ असो.. दक्षिण दिशेला तोंड असो.. समोर खड्डा, झाड किंवा.. लाईटचा ट्रान्सफॉर्मर असो.. किंवा आणखी काही वास्तुदोष असो.. दुकानात गर्दी नेहमीच असते…