दिवाळी सणाची माहिती | Diwali Information in Marathi | Diwali 5 Days information in Marathi

दीपावली शब्दउत्पत्ती आणि अर्थ | Meaning of Diwali in Marathi

दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ”. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे.

Diwali Festival information in Marathi

भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रमुख सणांपैकी एक सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी. यंदा दिवाळी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे. भारतीय लोक खूप उत्साहाने व आनंदाने दिवाळी सणाची वाट पाहतात. दिवाळी सण सर्व लोकांना एकत्र आणतो व सर्वांना नव्या आशा आणि आनंद देऊन जातो. अश्याच आपल्या आवडत्या दिवाळी सणाची माहिती / Diwali Information in Marathi आपण या लेखात पाहणार आहोत.

ADVERTISEMENT

दिवाळी सणाची माहिती मराठी

दिवाळी सण का साजरा केला जातो? | Why is Diwali Celebrated in Marathi?

दिवाळी सण साजरा करण्यामागे भारतात वेग-वेगळ्या कथा प्रचलित आहेत. महाराष्ट्रात वेगळी कथा आहे, तर उत्तर भारतात वेगळी कथा प्रचलित आहे. उत्तर भारतातील मान्यतेनुसार श्री रामाने रावणाचा वध केल्यानंतर ते त्यांच्या घरी अयोध्येला परत आले. त्या दिवशी अमावस्या होती म्हणून सर्व अयोध्या वासियांनी घरोघरी दीप लाऊन त्यांचे स्वागत केले. मान्यता आहे कि अंधारावर उजेडाचा विजय म्हणून तेव्हा पासून दिवाळी सण साजरा केला जातो. तर महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील मान्यतेनुसार भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून १६ सहस्त्र गोपिकांची नरकासुरापासून रक्षा केली व त्यांच्या आयुष्यातील अंधार संपवला, म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो.


दिवाळी सणातील ५ दिवसांचे महत्व | Importance of 5 Days of Diwali

दिवाळी हा ५ दिवस साजरा केला जाणारा सन आहे. ५ दिवसांची वेग वेगळी विशेषतः आहे. दिवाळीची तयारी हि एक-दोन आठवड्या आधीच सुरु होते. त्या तयारी मध्ये घराची साफसफाई आणि घराना रंग देने यांचा समावेश असतो. दिवाळी साठी नवे कपडे व नवीन वस्तू आणल्या जातात. त्यामुळे दिवाळीची सर्वजण खास करून लहान मुले खूप आतुरतेने वाट पाहत असतात. चला तर जाणून घेऊया दिवाळी सणातील ५ दिवस कुठले आहेत ते.

ADVERTISEMENT

वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी | Vasu Baras Or Govatsa Dwadashi

वसु बारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवसा बरोबरच पवित्र गाईच्या पूजेचा दिवस आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस म्हणजे वसु बारस. या वर्षी, वसुबारस हा सण 01 नोव्हेंबर, 2021 रोजी आहे. विविध प्रांतांमध्ये हा दिवस “गोवत्स द्वादशी” किंवा “नंदिनी व्रत” म्हणून साजरी करण्यात येते. तथापि, महाराष्ट्र राज्यात, हा सण अधिक उत्साहाने साजरा केला जातो. कारण तो गायी आणि वासरांच्या सन्मानाशी संबंधित आहे. या दिवशी शेतकरी बांधव एकमेकांना वसुबारसच्या शुभेच्छा देतात. याच दिवसापासून सर्व जण एकमेकांना ( दिवाळी शुभेच्छा / Diwali Wishes Marathi ) पाठवण्यास सुरुवात करतात.


धनतेरस किंवा धनत्रयोदशी | Dhanteras or Dhan Trayodashi

धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे. या दिवसाला धन त्रयोदशी असे देखील म्हंटले जाते. या दिवशी दिवाळीची सुरुवात होते. यंदा धनत्रयोदशी २ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे. या दिवसापासून लोक दीप लावण्यास सुरुवात करतात. या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी धन्वंतरी देवाचा जन्म दिवस होता. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवतेचा अभिषेक करून त्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशी या दिवशी दागिने घेणे शुभ मानले जाते. अनेक जण या मुहूर्तावर सोन्या आणि चांदीचे दागिने घेतात. असे मानले जाते की दिवाळीच्या या पहिल्या दिवशी देवी लक्ष्मीचा सर्वांच्या घरात प्रवेश होतो. त्यामुळे दारिद्र्याचा नाश होतो व सर्वीकडे सकारात्मकता पसरते.  या दिवशी धनत्रयोदशी च्या शुभेच्छा दिल्या जातात.


नरक चतुर्दशी | Narak Chaturdashi

दिवाळीच्या ५ दिवसांपैकी हा तिसरा दिवस आहे. नरक चतुर्दशी ला छोटी दिवाळी देखील म्हटले जाते. यंदा दिवाळी आणि नरक चतुर्दशी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे. याच दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता व १६ सहस्र गोपिकांना मुक्त केले होते. नरकासुराचा वध आणि गोपिकांची मुक्ती झाल्यामुळे या दिवशी विजयउत्सव म्हणून दीप लावण्याची परंपरा सुरु झाली. या दिवशी अशी मान्यता आहे कि पहाटे लवकर उठून जे स्नान करतात त्यांवर यमदेवता प्रसन्न होते. नरक आणि अकाल मृत्यूच्या भयापासून ते मुक्त होतात. या दिवशी नरक चतुर्दशी च्या शुभेच्छा दिल्या जातात.

ADVERTISEMENT

दिवाळी लक्ष्मी पूजन | Lakshmi Poojan

तिसरा दिवस म्हणजेच दिवाळी आणि लक्ष्मीपूजन. ५ दिवसाच्या दिवाळी सणामधील सर्वात महत्त्वाचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा मानला जातो. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे. या दिवशी सर्व लोक देवी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा करतात व त्यांना आपल्या घरात येण्याचे आवाहन करतात. त्यामुळे देवी लक्ष्मीचा वास कायम घरात राहो व कुबेर देव आपल्या धनाची रक्षा करो अशी प्रार्थना पूजा करतांना केली जाते. याच दिवशी सर्व दिवाळी फराळाचा आनंद घेतला जातो व फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीपूजन च्या शुभेच्छा दिल्या जातात.

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ..
हि दिवाळी आनंदाची, सुख समृद्धीची जावो.
शुभ दीपावली..!

Diwali vector created by starline – www.freepik.com

दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा | Diwali Padwa or Balipratipada

दिवाळी पाडवा हा दिवाळीचा ४ था दिवस असतो. यास बलिप्रतिपदा म्हणून देखील ओळखले जाते. यंदा बलिप्रतिपदा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे. या दिवशी असुर राजा बली यांचे पृथ्वी वर आगमन झाले होते. त्याचे स्वागत करण्यासाठी सगळीकडे दीप लाऊन अंधाराचा नाश करण्यात आला होता. यासोबतच भगवान श्री कृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळी वरती उचलून सर्व वृंदावन वासियांना इंद्र देवाच्या कोपा पासून वाचवले. म्हणून तेव्हापासून गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सुरवात केली जाते. यादिवशी बलिप्रतिपदा च्या शुभेच्छा दिल्या जातात.


भाऊबीज | Bhaubeej

दिवाळी सणाचा पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज. यंदा भाऊबीज ६ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे. हा दिवस भाऊ बहिणीच्या असीम प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्याची प्रार्थना करते. हा दिवस भारतात काही ठिकाणी टीका म्हणून ओळखला जातो. या दिवशी विवाहित बहीण आपल्या माहेरी येते अणि भाऊबीज साजरी करते. यादिवशी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या जातात.


प्रदूषण मुक्त दिवाळी कशी साजरी कराल? | How to Celebrate Safe Diwali

दिवसेंदिवस प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रदूषण एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे. आपण सर्वजण आनंदात दिवाळी साजरी करतो, परंतु हा दिवाळीचा सण साजरा करतांना आपल्याकडून कमीत कमी प्रदूषण कसे होईल आणि पर्यावरणाला आपल्याकडून कुठलीही इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. ती काळजी कशी घ्यायची आणि यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण पाहूया.

दिवाळीला सर्वात जास्त प्रदूषण हे फटाके फोडल्यामुळे होते. दिवाळी हा दिव्यांचा सन आहे फटाक्यांचा नाही. फटाक्यांपासून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळे संपूर्ण वातावरण दुषित होते. त्याच्या धुराचा आपल्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो. त्यामुळे पुढे चालून आपल्याला श्वासासंबंधी आजार होणार आहे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही.

या ५ दिवसात होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसावा म्हणून भारत सरकार कठोर पाऊले उचलत आहे. सरकारने फटाक्यावरती बंदी देखील आणली आहे. जेणे करून यापासून होणारे प्रदूषण कमी होईल. तरीही सामान्य जनता या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. सल्फर युक्त फटाके न वापरता नायट्रोजन चा वापर करून बनविले गेलेले इको फ्रेंडली फटाके कमी प्रदूषण करतात, म्हणून इको फ्रेंडली फटाक्यांचा वापर करावा. आपल्या सर्वाना माझी विनंती आहे कि आपण कमीत कमी फटाके फोडून हि दिवाळी साजरी करावी. आणि या चांगल्या कार्याला सुरुवात करावी.


आम्ही वर सादर केलेली संपूर्ण दिवाळी सणाची माहिती तुम्ही दिवाळी मराठी निबंध म्हणून वापरू शकता. आम्ही या लेखात Vasubaras Information, Dhantrayodashi Mahiti, Diwali Information, Laxmi Poojan information, Narak Chaturdashi, Diwali Padwa Mahiti, Balipratipada information, Bhaubeej Information Marathi देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हि Diwali info in Marathi कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.

आपण वसुबारस का साजरी करतो?

वसुबारस या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात होते. वसुबारसला गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. वैदिक पुराणात गायीला अत्यंत पवित्र स्थान आहे. गाईला “गौ माता” म्हणून संबोधले जाते, तिची या दिवशी अत्यंत आदराने पूजा आणि पालनपोषण केले जाते.

Why is Diwali Celebrated in Marathi?

दिवाळी सण साजरा करण्यामागे भारतात वेग-वेगळ्या कथा प्रचलित आहेत, यासाठी आमचा वरील दिवाळी सणाची माहिती हा संपूर्ण लेख वाचावा.