प्रत्येकाला एक बहिण असावी – Bahin Marathi Kavita

प्रत्येकाला एक बहिण असावी,
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी,
पण एक बहिण असावी…
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी ,
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी,
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी,
लहान असो वा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी,
लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी,
लहान असो वा मोठी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी”
म्हणून हाक मारणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी,
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही,
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,
स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी……!

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.

Comments are closed.