Aai Vadil Shayari

आई वडीलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी, आई वडीलांना कधीच सोडू नका…

Mi Devala Vicharle

मी देवाला विचारले, “तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते?” देव म्हणाला, “मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो, व आरोग्य परत मिळवण्यासाठी, तो सर्व पैसा खर्च करतो.. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व, भविष्यातही जगत नाही.. तो असा जगतो की, कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही…”

Kunachyahi Dukhacha Anadar Karu Naye

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही…

Manse Hi Jhadansarkhi Astat

माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात, काही फांदीसारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी.. आणि… काही मुळांसारखी असतात, जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी…