Nakaratmak Vichar Tula Harvu Shakat Nahit

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज, बुडवल्याशिवाय राहत नाही.. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही…

शुभ संक्रांत | Shubh Sankrant

विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा… शुभ संक्रांत!

Aayushya Matra Ekdach Ka

चांदणं तेच असलं तरी, रात्र अगदी नवीन आहे, आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…

Je Ladhtaat Tech Jinktaat

अर्धवट पिकलेली फळे गोड कधी लागत नाहीत, अर्धवट ज्ञान कधी उपयोगात येत नाही, स्वतःला बादशाह समजणारे मरायच्या भितीपोटी कधी कुठली लढाई स्वतः लढत नाहीत, विचारांच्या जोरावर अन ताकदीच्या धारेवर जे लढतात, त्यांच्यापासून विजयश्री दूर राहूच शकत नाही…