Marathi Sundar Thought

तुम्ही जसे आहात तसेच समोरच्या व्यक्तीने असावं, अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.. कारण एकत्र चालायचे म्हणून, तुम्ही कधीच दुसऱ्या व्यक्तीचा उजवा हात तुमच्या उजव्या हातात घेऊ शकत नाही…

Jeevan Ek Rangmanch Aahe

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते.. कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते.. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते…

Himmat Lagte Haat Dharun Thevayala

आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला, हिम्मत लागत नाही.. हिम्मत लागते ती, तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला…

Mehnat Ani Nashib

“लक” – या शब्दात दोन अक्षरे आहेत, “भाग्य” – या शब्दात अडीच अक्षरे आहेत, “नशीब” – या शब्दात तीन अक्षरे आहेत, “किस्मत”- या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत, पण हे चारही शब्द, “मेहनत” या शब्दांपेक्षाही लहान आहेत…