Palak Aste Tar Shalet Gelo Asto
काल बाजारात गेलो होतो भाजी आणायला, दोन लहान मुले बसली होती भाजी विकत, मी विचारले, “पालक आहे का?” त्या चिमुकल्यांचे उत्तर ऐकून मन सुन्न झालं, “पालक असते तर भाजी विकायला बसलो असतो का?” दादा शाळेत गेलो असतो हो…

आई आवडते, बायको आवडते, मैत्रीणही आवडते, मग मुलगी का नाही? तिला वाचवा.. भविष्य घडवा…
मी देवाला विचारले, “तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते?” देव म्हणाला, “मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो, व आरोग्य परत मिळवण्यासाठी, तो सर्व पैसा खर्च करतो.. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व, भविष्यातही जगत नाही.. तो असा जगतो की, कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही…”
माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात, काही फांदीसारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी.. आणि… काही मुळांसारखी असतात, जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी…