ATM Marathi SMS

ATM मधून 200 रुपये निघतांना इतका आवाज होतो की, असे वाटते चुकून 4-5 हजार निघतात की काय.. मशीन पण चेष्टा करते गरीबाची…

Manuski Peksha Mothe Kahich Nahi

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही, कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही… शुभ सकाळ!

Birthday Wishes in Marathi for Friend

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Subh Lagnacha Vadhdivas

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे, संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…