Navra: Kal Ratri Majhya Swapnat

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… ☺☺☺

Navra Bayko Lungi Joke Marathi

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? ☺☺☺

Sardar: Doctor Mala Jevan Kelyavar Bhuk Lagat Nahi

सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू? डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल… ☺☺☺

Boss: Tula Aaj Ratriparyant Thambun File Purn Karavi Lagel

बॉस: तुला आज रात्रीपर्यंत थांबून फाईल पुर्ण करावी लागेल, ज्युनियर: माफ करा सर, पण मला नाही जमणार, बॉस: का नाही जमणार? ज्युनियर: माझ्या धंद्याची वेळ होते, बॉस: म्हणजे? ज्युनिअर: रात्री मी रिक्षा चालवतो, फक्त कंपनीच्या पगारात घर थोडीच चालतंय, बॉस: बस कर यार, आता काय रडवणार का मला? कधीतरी ये रात्री आपल्या बायको पोरांना घेऊन माझ्या पाव-भाजीच्या गाडीवर…