Garib Quotes in Marathi:
मित्रांनो ये लेखामध्ये आम्ही आपणास गरीबी स्टेटस मराठी, परिस्थिती स्टेटस मराठी, गरीब शायरी मराठी तसेच Garibi Quotes in Marathi सादर केले आहेत. समाजात गरीब श्रीमंत हा भेदभाव चालूच राहणार कारण श्रीमंती जोपर्यंत आहे तोपर्यंत गरिबांची किंमत हि कमीच केली जाणार. गरिबी हा माणसाचा दोष नाही तर तो श्रीमंतांच्या मानसिकतेचा रोग आहे. माणूस तनाने गरीब असला तरी चालेल पण मनाने मात्र श्रीमंत असला पाहिजे. विचारांनी श्रीमंत असला पाहिजे.
माणूस गरीब हा परिस्थिती मुळे ठरतो, तोच माणूस जर श्रीमंत घरात जन्मला तर श्रीमंत म्हणून ओळखला जातो. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग! पण तुम्ही गरीब घरात जन्माला आला आणि गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचा दोष.. कारण श्रीमंत बनण्यासाठी गरज आहे मेहनतीची, जिद्दीची आणि चिकाटीची. तुम्ही चांगले शिक्षण घेऊन अथवा चांगल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत नक्कीच बनू शकता. फक्त तुमचा स्वतःवर आणि तुमच्या कामावर विश्वास असला पाहिजे.
समाजात गरीब श्रीमंत असा भेदभाव करणाऱ्या लोकांना खाली दिलेले संदेश हि एक जबरदस्त चपराक आहे. याचा वापर तुम्ही सोसिअल मीडिया वर स्टेटस आणि डीपी ठेवण्यासाठी करू शकता. तुम्हाला खाली दिलेले गरीब श्रीमंत स्टेटस नक्कीच आवडतील अशी आशा आहे. तुमच्याकडे आणखी काही असेच संदेश असतील तर कंमेंट्स मध्ये नक्की लिहा आम्ही ते याच लेखात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे..
गरीबांची कधी चेष्टा उडवु नका..
कारण नशीब पलटायला आणि
गरीब व्हायला वेळ लागत नाही शेठ..!
स्वतःच्या गरीबीची लाज कधीच वाटू देवू नका,
कारण पैसा कमी असला तरी,
आपल्या आई वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती..
परिस्थिती गरीब असली तरी चालेल,
पण विचार भिकारी नसावेत..
कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार करु नका,
कारण आपल्याला जे मिळते,
ते काही लोकांना मिळत सुद्धा नाही..!!
जेवढं मिळतंय त्यातच आनंद मानायला शिका..
कारण जे तुम्हाला मिळतंय ते अनेकांसाठी स्वप्न आहे..!!
जोडीदार गरीब असला तरी चालेल,
पण आयुष्यभर साथ देणारा हवा..