Aaturta Ganeshachya Aagmanachi

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!


Aaturta Ganarayachya Aagmanachi

देव येतोय माझा,
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट..
गणराया तुझ्या आगमनाची…!


Bappachya Aagmanachi Aaturta

११ दिवस मंडपात, आणि ३६५ दिवस
हृदयात राहणारा आपला बाप्पा येतोय..
१० सप्टेंबरला
गणपती बाप्पा मोरया!


Aaturta Aagmanachi Status

आतुरता तुझ्या नव्या रूपाची,
आतुरता लाडक्या बाप्पाच्या आगमनाची..


Aaturta Bappachya Aagmanachi

झाली का तयारी ?
आता येतोय मी घरी..
उंदीरमामा प्रवासात,
थकले आहेत भारी..
मी येतोय..!


डोळे कितीही झाकले,
तरी गुल्लाल हा उडणारच..
आणि कितीही दंड ठेवला,
तरी DJ हा वाजणारच..
कारण बाप्पा येतोय माझा…
गणपती बाप्पा मोरया!


Aaturta Aagmanachi Marathi Caption

वाट पाहता बाप्पा तुझी,
कळलेच नाही वर्ष कसे सरले..
आता तुझ्या आगमनाला
थोडेच दिवस उरले..


आतुरता बाप्पाच्या आगमनाची

सुखकर्ता, दुखहर्ता,
संकटनिवारक, विघ्नहर्त्याची,
उत्सवमूर्ती, गणरायाची,
आतुरता बाप्पाच्या आगमनाची..


आस लागली तुला पाहण्याची,
ओढ आहे तुझ्या दर्शनाची..
उधळण झाली चोहीकडे आनंदाची
आतुरता बाप्पाच्या आगमनाची 🌺🙏


ओढ तुझ्या आगमनाची

दुःखहर्ता तू ये लवकर,
सोबत सुखं घेऊन ये उंदरावर,
सजविले हे घर तू येणार म्हणून,
पटकन ये तू मोदक ठेवलेत करून..
ओढ माझ्या गजाननाची..
आतुरता तुझ्या आगमनाची..


आगमनी गणरायाच्या,
नटली नगरी सारी..
येतील बाप्पा आमुचे,
घेऊन मूषक स्वारी..

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.