Jagtik Mahila Dinachya Shubhechha

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला.. ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला.. ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला.. आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला.. “प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…” जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Holichya Ani Rangpanchmichya Hardik Shubhechha

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी, “काळा” रंग तुमच्या केसांसाठी, “निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी, “पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी, “गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी, “सफेद” रंग तुमच्या मनासाठी, “हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा Rang Panchamichya Rangmay Shubhechha

Niyati Ani Nashib

नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते.. बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…

Jhalelya Goshtivishayi Chinta Karu Naka

जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून, चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही.. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल, त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे…