Congress Jhindabad Joke

एक गरीब माणूस मासा पकडून आणतो, पण बायको त्याचे कालवण करू शकत नाही.. कारण, घरात गॅस नाही, वीज नाही आणि ऑईल हि नाही.. मग हा माणूस माशाला नेऊन परत नदीत सोडतो, तेव्हा मासा पाण्यातून वर येतो आणि ओरडतो, काँग्रेस झिंदाबाद, पुन्हा एकदा ५ वर्षे…!

Kuni Jar Aaplyala Chidvat Asel

कुणी जर आपल्याला चिडवत असेल किंवा जळवत असेल तर आपण चिडायचे नाही किंवा त्याला आपल्याला काही त्रास होतोय असेही दाखवायचे नाही, म्हणजे त्याला हवी असलेली नेमकी प्रतिक्रिया आपण देतच नाही, आणि त्याच चिडवणं आपोआपच थांबते… आपण जर चिडलो तर तो जिंकला असे त्याला वाटेल, म्हणून त्याला आपण नेहमी खुश आहोत हे दाखवा म्हणजे तुम्ही जिंकाल…

Bhutkal Satat Dokyat Thevla Tar

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो.. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे…

Swathavar Vishvaas Theva

फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून, आपल्या पंखावर विश्वास असतो… “Always’s Trust Ur Self”