Vadil Ani Ganya Joke

वडील : काय रे! काल रात्री तू शेजारच्या कवीताला काय म्हणाला?? गन्या : कुठं काय म्हटलं?? वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का आली? गन्या : मला काय माहीत! वडील: हे बघ.. खरं काय ते सांग, नाहीतर.. तुला.. लय मारीन… गन्या : आता बघा बाबा.. आपण सकाळी चहा पीत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो? वडील : या चहा प्यायला.. गन्या : दुपारी आपण जेवत असतांना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो? वडील : या जेवायला.. गन्या : आता रात्री कवी आपल्या घरी आली तेव्हा मी झोपत होतो, म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला…! वडील कोमात..!! गन्या जोमात..!! ☺☺☺

गणपती बाप्पा मोरया

प्रथम वंदन करूया, गणपति बाप्पा मोरया.. कुणी म्हणे तुज “ओंकारा” पुत्र असे तू गौरीहरा.. कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता” तू स्रुष्टिचा पालनकर्ता.. कुणी म्हणे तुज “एकदंता” सर्वांचा तू भगवंता.. कुणी म्हणे तुज “गणपती” विद्येचा तू अधिपती.. कुणी म्हणे तुज “वक्रतुंड” शक्तिमान तुझे सोँड.. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया…!

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

Guru Mhanje

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!