दिवाळी सणाची माहिती | Diwali Information in Marathi | Diwali 5 Days information in Marathi
दीपावली शब्दउत्पत्ती आणि अर्थ | Meaning of Diwali in Marathi दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ”. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. Diwali Festival information in Marathi भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रमुख सणांपैकी एक सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी. यंदा दिवाळी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे. भारतीय लोक खूप उत्साहाने व आनंदाने दिवाळी सणाची वाट पाहतात. …