Aayushyatle Sarvat Mothe Sarthak

आयुष्यातला सर्वात मोठा अपराध हाच असतो की, आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे, आणि आयुष्यातले सर्वात मोठे सार्थक हेच की, आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे, अश्रु तेच असतात पण फरक जमीन आसमानचा असतो…

Ji Vyakti Tumchya Pragtivar Jalte

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते, त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते…

Shikshanacha Ani Aklecha Kahihi Sambandh Nasto

वडील अडाणी असतात, आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात, वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..? मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत? मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे… ( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो ) तुम्हीही मुलाप्रमाणेच विचार करत होता ना…?

Paus Ani Bayko Status

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी…