Prem Tikvayche Aste

जीवन नुसते जगायचे नसते, त्याला सजवायचे असते, सजवितांना एक लक्षात ठेवायचे असते, सजवितांना कोणी तरी हवे असते, प्रेम नुसते करायचे नसते, तर ते टिकवायचे असते, ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वाचे असते…

Ti Asavi Majhyavar Prem Karnari

ती असावी शांत निरागस, मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या वेदना समजणारी, डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी, ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी, वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी…

Vait Divas Shikvan Detat

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात…

Maitri Mhanje

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा, मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब, मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू, मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू…