Shiv Jayanti Wishes Marathi | Shiv Jayanti Quotes in Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी

शिवाजी महाराज जयंती हा महान योद्धा आणि महान राजाचा जन्मदिवस म्हणून तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरा केला जातो. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारताच्या इतिहासातील महान शासकांपैकी एक होते. खाली त्यांचे काही प्रसिद्ध संदेश दिलेले आहेत जे त्यांचे शहाणपण, नेतृत्व, धैर्य आणि देशभक्ती दर्शवतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या लेखात आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत शिवाजी महाराज स्टेटस मराठी / Shivaji Maharaj Status Marathi, शिवाजी महाराज पोवाडा, शिवजयंती स्टेटस, शिवजयंती शायरी आणि बरेच काही.. आम्हाला आशा आहे कि ह्या शिवजयंतीच्या शुभेच्छा / Shiv Jayanti Quotes in Marathi तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही आपल्या शिवभक्तांना नक्कीच शेअर कराल. Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi | …

Read more

शिवजयंती मेसेज | Shiv Jayanti Message

श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग.. देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव जयंती संदेश | Shivjayanti Sandesh

भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र : त्रस्त मोगलांना करणारे, प : परत न फिरणारे, ति : तिन्ही जगात जाणणारे, शि : शिस्तप्रिय, वा : वाणिज तेज, जी : जीजाऊचे पुत्र, म : महाराष्ट्राची शान, हा : हार न मानणारे, रा : राज्याचे हितचिंतक, ज : जनतेचा राजा अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा… शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा ! Shiv Jayantichya Lakh Lakh Shubhechha Status Shiv Jayantichya Lakh Lakh Shubhechha