Shiv Jayanti Wishes Marathi | Shiv Jayanti Quotes in Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी

शिवाजी महाराज जयंती हा महान योद्धा आणि महान राजाचा जन्मदिवस म्हणून तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरा केला जातो. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारताच्या इतिहासातील महान शासकांपैकी एक होते. खाली त्यांचे काही प्रसिद्ध संदेश दिलेले आहेत जे त्यांचे शहाणपण, नेतृत्व, धैर्य आणि देशभक्ती दर्शवतात.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या लेखात आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत शिवाजी महाराज स्टेटस मराठी / Shivaji Maharaj Status Marathi, शिवाजी महाराज पोवाडा, शिवजयंती स्टेटस, शिवजयंती शायरी आणि बरेच काही.. आम्हाला आशा आहे कि ह्या शिवजयंतीच्या शुभेच्छा / Shiv Jayanti Quotes in Marathi तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही आपल्या शिवभक्तांना नक्कीच शेअर कराल.

ADVERTISEMENT

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi | Shiv Jayanti Quotes in Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी

*अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,*
*हिंदवी स्वराज्य संस्थापक, 🚩*
*राजाधिराज, पुण्यश्लोक, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्या
आपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक शुभेच्छा..✌😊🎉*


Jagat Bhari 19 February Status | 19 फेब्रुवारी शिवजयंती स्टेटस

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

ADVERTISEMENT

आपल्या देवांच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या धर्माचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या दैवताची जयंती आहे.
आपल्या शिवरायांची जयंती आहे…
हिंदवी स्वराज्य संस्थापक,
प्रतिपालक,
सिंहासनाधिश्वर,
राजाधिराजाय,
क्षत्रियकुलावतंस,
छत्रपती शिवाजी महाराज,
यांच्या जयंती निमित्त,
त्रिवार मानाचा मुजरा…
🚩 जय शिवराय..🚩
19 फेब्रुवारी 2023..🙏🚩


छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा तिथीनुसार

!! जय शिवराय !!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा..
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..!

Shiv Jayanti Wishes Tithi Nusar 2022

ADVERTISEMENT

 

शुभ सकाळ
जय जिजाऊ
जय शिवराय
शिवजयंती
(तिथीप्रमाणे)
पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्या
सर्वांच्या नजरा..
जन्मदिनी राजे तुम्हाला
मानाचा मुजरा..
शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना
शिवमय शुभेच्छा..!


जन्मदिन शिवरायांचा,
सोहळा मराठी अस्मितेचा..
🚩जय शिवराय.. जय शिवशाही..🚩

Shiv Jayanti Wishes in Marathi | शिव जयंतीच्या शुभेच्छा

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
जय शिवराय..!


ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे..
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो,
मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..!
🚩 जय_जिजाऊ.. जय_शिवराय..जय_शंभूराजे.. 🚩

Jay Shivray Shivjayanti Shubhechha | जय शिवराय शिवजयंती शुभेच्छा

सर्व शिव भक्तांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जय शिवराय..!


माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..
धन्य धन्य माझे शिवराय🙏
🙏!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!🙏
🚩 !! जय शंभूराय !!🚩

Shiv Jayanti Utsav | शिवजयंती उत्सव

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


पापणीला पापणी भिडते,
त्याला निमित्त म्हणतात…
वाघ दोन पावलं मागे सरकतो,
त्याला ‎अवलोकन म्हणतात…
आणि,
हिंदवी स्वराज्याची स्थापना
करणाऱ्या वाघाला,
छत्रपती शिवराय म्हणतात..
🚩जय शिवराय🚩

Shiv Jayanti Quotes in Marathi | शिव जयंती कोट्स मराठी

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!


भगव्याची साथ कधी सोडनार नाही..
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही..
दिला तो अखेरचा शब्द..
होई काळ ही स्तब्ध..
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची खंत..
आम्ही आहोत फक्त,
राजे शिवछञपतींचे भक्त🙏
⛳जय_शिवराय⛳


भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!


Shiv Jayantichya Shubhechha Image | शिव जयंतीच्या शुभेच्छा इमेज

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…
शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !


इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती..
मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो…
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


Shivaji Maharaj Shayari in Marathi | शिवाजी महाराज शायरी मराठी

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!


Shiv Jayanti Quotes in Marathi Language

जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला
शिकवणारे राजे म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


निधड्या छातीचा,
दनगड कणांचा..
मराठी मनांचा..
भारत भूमीचा एकच राजा..
छत्रपती शिवाजी महाराज यांना
मानाचा मुजरा..🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..! ⛳


गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय..
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान
जगात कोणतंच नाही..
*🙏जय जिजाऊ🙏*
*🚩जय शिवराय🚩*


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना,
पण ज्यांचे एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात,
त्यांना “छत्रपती” म्हणतात..!
🚩🚩….जय_जिजाऊ….🚩🚩
🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩


यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा..
शिवजयंती २०२२ निमित्त सर्व शिव भक्तांना
शिवमय भगव्या शुभेच्छा..!


प्रौढ प्रताप पुरंदर घोषणा

प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती,
शिवाजी महाराज की
जय..!🌺⛳️
शिव सकाळ!


पहिला दिवा त्या देवाला,
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे..🪔
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर,
आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा एकच राजा म्हणजे,
“राजा शिवछत्रपती”
यांना मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा..!


यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि,
आत्मविश्वास मिळवण्यासाठी,
*छञपतींचा* इतिहास माहिती पाहिजे..
🚩जय जिजाऊ.. जय शिवराय..🚩


जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!!
!!! जय शिवराय !!!
“शिवजयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!”


देवा जन्म दिला जरी पुढील जन्मी,
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे..
आणि,
त्या फूलाची जागा माझ्या राजाच्या पायावर असू दे..
🚩!! जय जिजाऊ.. जय शिवराय !!🚩


चार शतकं होत आली,
तरी नसानसांत राजे..
आले गेले कितीही,
तरी मनामनात राजे..
स्वराज्य म्हणजे राजे,
स्वाभिमान म्हणजे राजे..
🚩शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..! 🚩


इतिहास घडवुन गेलात तुम्ही..
भविष्यात तुमची आठवण राहील..
दुनिया जरी संपली तरी,
राजे तुमची शान राहील…
🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩


“शिवराय” हे फक्त नाव नव्हे..
तर, जगण्याची प्रेरणा,
आणि यशाचा मंत्र आहे..🚩


आमचे महाराज
माणसातले देव आहेत,
हे सिध्द करायची
गरज नाही..
इतिहास आहे साक्षीला..
दोन्ही हात जोडून
नमस्कार घालतो शिवमुर्तीला..
आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला..
!!जय जगदंब !!
🚩!! जय शिवराय!!🚩


हर तलवार पर,
छत्रपती कि कहानी है..
‎तभी तो पुरी दुनिया,
छत्रपती कि दिवानी है…!!⛳
फक्त शिवभक्त..🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ..! जय शिवराय..!!


Shivjayanti Caption in Marathi

जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र म्हणजे 🚩शिवराय🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा..!

 

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून,
अभिमानाने भरून जाई छाती..
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात,
वसतात राजे शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या सर्वाना शुभेच्छा..!


या भूमंडळाचे ठायीं। धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्रधर्म राहिला कांही। तुम्हा कारणें।।
रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..!