Swatachya Jeevavar Jagayla Shika
स्वतःच्या जीवावर जगायला शिका.. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल…!
स्वतःच्या जीवावर जगायला शिका.. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल…!
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात…
तुम्ही लहान आहात म्हणून, तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका कारण, वाघ लहान असो की मोठा, वाघच असतो…
प्रयत्न करा, एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडुन देऊ नका, ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी, त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका…