वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Mitra

मित्र असावा तुझ्यासारखा, स्वतःच्या घासातला घास देणारा.. मित्र असावा तुझ्यासारखा, वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा, मित्र असावा तुझ्यासारखा, वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा.. खूप आले आणि खूप गेले, पण मित्रा हृदयात घर तू केले.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं नातं खास आहे, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील, पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील, तुझे रुसणे फुगणे मला आवडते, त्यातूनच तुझे माझे नाते फुलते, हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

Happy Birthday Wishes in Marathi Language Text

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! पहा आणखी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes in Marathi

Birthday SMS for Husband in Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!