Vadhdivsachya Shubhechha Marathi

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही, अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Tuza Vadhdivas Marathi SMS

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस… अभिनंदन!

Marathi Birthday SMS for Girlfriend

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली… पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं! बस्स! आणखी काही नको… काहीच! वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!