Jal Pratidnya – Jagtik Jal Din

२२ मार्च हा जागतिक जलदिन –
आज मी प्रतिज्ञा करतो की,
पाणी हे जीवन असुन,
त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन…
मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही,
नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व
पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.
पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन.
पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन…

जय हिंद! जय महाराष्ट्र!!
“पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती”

ADVERTISEMENT