सासूबाई - जावईबापू, पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल..? जावई - मला पुढल्या जन्मी पाल व्हायला आवडेल.. सासूबाई - का हो..? जावई - कारण तुमची लेक पालीला खूप घाबरते...

नवरा - आज जेवण सासूबाईंनी केलंय ना...? बायको - कसं काय ओळखलं..? नवरा - तू जेवण करायचीस तेव्हा काळे केस सापडायचे..  आज सफेद सापडलाय...

एका व्यक्तीच्या बायकोचं अपहरण झालं... दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्यानं नवऱ्याला कॉल केला... अपहरणकर्ता - आज रात्रीपर्यंत १० लाख रुपये दिले नाहीस तर... नवरा - तर काय..? अपहरणकर्ता - तर आम्ही तुझ्या बायकोला सोडून देऊ... नवरा - प्लीज असं करू नका.. पत्ता सांगा.. मी लगेच पैसे घेऊन पोहोचतो..

नवरा - आज मला मॉलमध्ये एक महिला दिसली... अगदी तुझ्यासारखीच दिसत होती... यावर बायकोनं केवळ एकच प्रश्न केला.. त्या प्रश्नाला हो असं उत्तर दिलं तरी नवरा मार खाणार आणि नाही असं दिलं तरीही मार खाणार... बायकोनं विचारलं, मग आवडली का ती महिला..?

जज - तुम्हाला घटस्फोट का हवाय..? नवरा - माझी बायको माझ्याकडून खूप कामं करून घेते.. लसूण सोलायला सांगते.. कांदे चिरायला लावते.. भांडी घासून घेते... जज- मग त्यात काय इतकं..? पुढे वाचा..

नवरा- मला खूप कंटाळा येतो हो.. मला घटस्फोट हवा.. जज - लसूण आधी थोडी गरम करा.. अगदी सहज सोलली जाईल.. कांदे चिरण्याआधी ते फ्रिजमध्ये ठेवा.. मग कांदे चिरताना डोळे झोंबणार नाहीत.. भांडी घासण्याआधी १० मिनिटं ती टबमध्ये ठेवा.. म्हणजे घासताना जास्त त्रास होणार नाही... नवरा - आलं माझ्या लक्षात.. द्या तो घटस्फोटाचा अर्ज परत...

बायको - मी तुम्हाला सोडून गेले तर काय कराल..? नवरा - मी तर वेडा होईन वेडा... बायको - तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना..? नवरा - वेड्याचा काय भरोसा? वेडा काहीही करू शकतो...

नवरा - बायको सिनेमा पाहायला जाणार होते... नवरा दाराजवळ बायकोची बराच वेळापासून वाट पाहत होता... नवरा (संतापून) - आणि किती वेळ लागणार आहे तुला..? बायको (शांतपणे) - अहो, कशाला ओरडताय..? एका तासापासून सांगतेय ना ५ मिनिटांत येते...