Vat Purnima Wishes Marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Dear नवरोबा,
वडाच्या झाडाइतके दीर्घायुष्य मिळो तुला..
जन्मोजन्मीअसाच तुझा सहवास लाभो मला..
वटपौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा.. !

ADVERTISEMENT

तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं..
तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली..
तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले..
ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला,
तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस..
वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..!


बायको उद्या वटपौर्णिमा आहे,
तू करणार ना माझ्यासाठी व्रत..


मराठी संस्कृतीची प्रतिमा..
सवित्रीच्या निष्ठेच दर्पण..
बांधुनी नात्यांचे बंधन,
करीन साता जन्माचे समर्पण..
सर्व सौभाग्यवती माता भगिनींना,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तु..
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावा तू..!!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!


परिवाराच्या रक्षणार्थ,
पतीच्या खांद्याला खांदा लावुन,
संसाराची धुरा सांभाळणाऱ्या,
प्रत्येक माता भगिनींना,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT


सण सौभाग्याचा..
बंध अतूट नात्याचा,
या मंगलदिनी पूर्ण होवोत,
तुमच्या सर्व इच्छा..
सर्वांना वटपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आज वटपौर्णिमा,
आजच्या दिवशी सावित्रीने
यमाकडून आपल्या पतीचे,
सत्यवानाचे प्राण परत आणले होते..
सत्यवानाचे वाचवूनी प्राण,
सावित्रीने हिंदु धर्माची वाढवली शान..
सण सौभाग्याचा..
बंधन अतुट नात्याचा..
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा..
सर्व सुवासिनींना वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !


प्रिय नवरोबा,
वट पौर्णिमा निमित्त तुम्हाला,
वडाच्या झाडासारखे दिर्घायुष्य लाभो..!
व जन्मो-जन्मी तुमची साथ अशीच कायम लाभो..!


सात जन्माचं तर माहीत नाही,
पण हा जन्म तुझ्यासोबत,
समाधानाने जगायचा आहे..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


वटपौर्णिमा उखाणे

पतिव्रता सावित्री पुढे, हार मानली यमाने..
— रावांचे नाव घेते आदर व प्रेमाने..


वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात..
—- रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ..


वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ..
—- रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ..


वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून..
—- रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून..


वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान..
— रावांसोबत, मी संसार करीन छान..