Vastu Shanti Invitation SMS Marathi

Vastu Shanti Invitation SMS Marathi

स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने,
कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,
तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने,
रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने…

स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची,
वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा XXवार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

आपले नम्र –
स्थळ –


Vastu Shanti Invitation Marathi Format

एक वीट श्रमाची… एक वीट कष्टाची एक वीट आई वडिलांच्या आशिर्वादाची
एक वीट बहिणीच्या प्रेमाची… आता हवी एकच वीट आपल्या सहकार्याची

सप्रेम नमस्कार वि. वि.
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
आमच्या नवीन वास्तूची शांती व सत्यनारायणाची महापूजा
__वार दिनांक __ रोजी __ वाजता आयोजित केली आहे.
तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळ
उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती…

आपले स्नेहांकित –
स्थळ –                            मो –


Home Vastu Shanti Invitation in Marathi

||श्री गणेशाय नमः||

ईश्वराचा आशीर्वाद
श्रमाचे साफल्य, आई – आजीची पुण्याई,
मनाच्या स्पंदनात रचलेले सुंदर स्वप्न,
म्हणजे __ सदन
आमच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी वास्तुशांती सोहळ्यास
सहकुटुंब उपस्थित राहून आमच्या आनंदात
सहभागी व्हावे ही विनंती…
__वार दिनांक :- __ वेळ:- __

निमंत्रक-
स्थळ –                            मो –


Satyanarayan Pooja Invitation in Marathi

श्री सत्यनारायण महापूजा
__वार   दिनांक:- ___   वेळ:- __
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि आमच्या येथे
श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात
आली आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार
मित्रमंडळींसह तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती
निमंत्रक-
स्थळ-


Vastu Shanti and Satyanarayan Puja Invitation Marathi

वास्तूशांती व श्री सत्यनारायण महापूजा

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की
__वार  दिनांक :- ___ रोजी ____वाजता
आमच्या नवीन घराची वास्तूची शांती
व सत्यनारायणाची महापूजा करण्याचे योजिले आहे
तरी आपण सहपरिवार, सहकुटुंब उपस्थित राहून
या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून,
स्नेह भोजनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती…
प्रीतिभोज:-
आपला नम्र-
निवास स्थान-

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.